‘त्या’ मच्छिमारांना १४ वर्षांनी मिळाला न्याय
By admin | Published: June 17, 2017 01:10 AM2017-06-17T01:10:45+5:302017-06-17T01:10:45+5:30
ओएनजीसी च्या रक्षका कडून समुद्रात मच्छीमाराना नग्न करून मारहाण करण्या बरोबर त्यांच्या व्यवसाय साहित्याचे नुकसान करणे ई. कारणा
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : ओएनजीसी च्या रक्षका कडून समुद्रात मच्छीमाराना नग्न करून मारहाण करण्या बरोबर त्यांच्या व्यवसाय साहित्याचे नुकसान करणे ई. कारणा विरोधात बांद्रयाच्या कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्च्या दरम्यान झालेल्या दगडफेकीत दहा पोलीस जखमी झाल्याचा आरोप करीत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे माजी अध्यक्ष रामभाऊ पाटील ह्यांच्यासह अन्य तीन लोकांविरोधात पोलिसांनी ठेवलेले दोषारोप बांद्रा न्यायालयाने फेटाळून लावीत सर्वाची निर्दोष मुक्तता केली. चौदा वर्षाच्या न्यायालयीन प्रक्रि येच्या वनवासा नंतर मच्छीमार नेत्यांची निर्दोष मुक्तता झाल्याने मच्छीमारांनी आनंद व्यक्त केला आहे.
समुद्रात मासेमारी क्षेत्रात अनेक ठिकाणी ओएनजीसीने तेल आणि वायू मिळविण्यासाठी सर्वेक्षण प्लॅटफॉर्म बनविल्याने पालघर, वसई, डहाणू तालुक्यातील हजारो मच्छीमार बोटींना पुरेसे मासेमारी क्षेत्रच उरले नव्हते. त्यातच समुद्रात जबरदस्तीने सिरॅमिक सर्वेक्षण करण्यात येत असल्याने मच्छीमाराना मासेमारीपासून वंचित राहावे लागुन त्यांच्या जाळ्यांचे मोठे नुकसान केले जात होते. तसेच समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराना तुम्ही प्रतिबंधित क्षेत्रात आल्याचा ठपका ठेवून त्यांना आपल्या सुरक्षा रक्षका मार्फत नग्न करून बेदम मारहाण केली जात असल्याचा मच्छीमारांच्या तक्र ारी होत्या. मच्छिमारांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणार अॅड. मुणगेकर ह्यांनी सबळ पुरावे न्यायालया समोर मांडले. १२ जून रोजी दिलेल्या निर्णयात सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
ैअशी आहे घटना...
अनेक वेळा अर्ज, निवेदने देऊनही काही फरक पडत नसल्याने ३० जानेवारी २००३ रोजी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे तत्कालीन अध्यक्ष रामभाऊ पाटील ह्यांच्या नेतृत्वा खाली हजारो मच्छीमारांचा प्रचंड मोर्चा ओएनजीसी वर काढण्यात आला होता. ह्या दरम्यान झालेल्या दगड फेकीत ३ इन्स्पेक्टर व १० पोलीस जखमी झाल्याने त्यांनी अध्यक्ष पाटील, उपाध्यक्ष मोतीराम भावे, दिलीप पागधरे, विठ्ठल तरे ह्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.