उपऱ्यांच्या पर्ससीन नेट ट्रॉलरची बेसुमार मच्छीमारी : अधिका-यांची गस्तीला दांडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 03:09 AM2018-12-27T03:09:28+5:302018-12-27T03:11:22+5:30
शासकीय सुट्टीच्या दिवशी अनेक मत्स्यव्यवसाय अधिकारी नौकाद्वारे घातल्या जाणा-या गस्तीला अनुपस्थित राहत असून त्याचा फायदा घेऊन शेकडो पर्ससीन नेटधारक ट्रॉलर्स किना-यालगत प्रतिबंधित भागात मासेमारी करून कवींचे नुकसान करीत आहेत.
- हितेन नाईक
पालघर : शासकीय सुट्टीच्या दिवशी अनेक मत्स्यव्यवसाय अधिकारी नौकाद्वारे घातल्या जाणाºया गस्तीला अनुपस्थित राहत असून त्याचा फायदा घेऊन शेकडो पर्ससीन नेटधारक ट्रॉलर्स किना-यालगत प्रतिबंधित भागात मासेमारी करून कवींचे नुकसान करीत आहेत. महिन्यातून फक्त एकच दिवस सुट्टी घेण्याच्या आयुक्तांच्या आदेशाला पायदळी तुडविणाºया या अधिकाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांमधून केली जात आहे.
|
बॉटम ट्रॉलिंग, पर्ससीन नेट, एलईडी या विनाशकारी पद्धतीने होणारी मासेमारी आणि मासेमारी नौकांची वाढती संख्या आदी कारणाने सध्या मासेमारीचे प्रमाण वाढले असून मच्छिच्या घटत्या उत्पादनामुळे अधिकाधिक मासे पकडण्यासाठी ईईझेडच्या प्रतिबंधित भागात येऊन मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात आहे. राज्य शासनाने कोकण किनारपट्टीवरील ५ ही जिल्ह्यात १२ नॉटिकल समुद्री क्षेत्रात पर्ससीन मासेमारीला बंदीे. बंदी घातली असतानांही जिल्ह्यातील वडराई, सातपाटी, डहाणू गावाच्या समोर ६ ते १० नॉटिकल मैलावर १०० ते २०० ट्रॉलर्स समूहाने एकत्र येवून लहान मच्छीमारांच्या कवी, जाळ्याचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे शासनाने या ट्रॉलर्स वर कारवाईसाठी ५ जिल्ह्यासाठी ४ वेगवान गस्ती नौका भाडेतत्वावर घेतल्या आहेत.
सन २०१८-१९ या वर्षासाठी पालघरसह अन्य जिल्ह्यासाठी गस्तीनौका कार्यान्वित करतांना जिल्ह्याच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांच्या देखरेखीखाली असणाºया परवाना अधिकारी, कर्मचाºयांनी दिवसा किंवा आवश्यकते नुसार रात्रीही गस्त घालण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी दिलेले आहेत. तसेच महिन्यातून स्थानिक परिस्थितीनुसार सुट्टीचा दिवस अथवा रविवार या दोघांपैकी एक दिवस वगळून बाकी सर्व दिवस गस्त घालण्याचे आदेश दिलेले असताना अनेक भागात मत्स्यव्यवसाय अधिकारी गस्त घालताना दिसत नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. मागील अनेक महिन्यापासून मोठ्या समूहाने ट्रॉलर्सची इथल्या प्रतिबंधित क्षेत्रात घुसखोरी सुरू असतांना त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नसल्याची तक्रार शासनाकडे करण्यात आली आहे. ६ आॅक्टोबर २०१८ ला एका ट्रॉलर्सवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केल्या नंतर तब्बल अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर २० डिसेंबरला दुसºया ट्रॉलर्सवर कारवाई केली गेली आहे. अनेक शासकीय सुट्टीच्या कालावधीत मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी गस्ती नौकेवर अनुपस्थित राहून सुट्ट्या उपभोगत आहे.
परके, अधिका-यांचे रॅकेट
नेमक्या त्याच वेळी अनेक ट्रॉलर्स इथे येऊन मोठ्या प्रमाणात मासे पकडून कवीच्या जाळ्याचे नुकसान करीत आहेत. या ट्रॉलर्स मालकांचे काही मत्स्यव्यवसाय अधिकाºयांशी संगनमत असल्याने काही ट्रॉलिंगची परवानगी घेऊन पर्ससीनने मासेमारी करीत असल्याचा आरोपही केला जात आहे.
शेकडोच्या संख्येने पर्ससीन नेट मासेमारीसाठी येणाºया ट्रॉलर्स वर कारवाईसाठी अपुरी यंत्रणा असल्याने मत्स्यव्यवसाय विभाग, कोस्टगार्ड आणि पोलीस यांची संयुक्तिक यंत्रणा उभारा - नरेंद्र पाटील, अध्यक्ष, एनएफएफ.