मुलीच्या लग्नातील पाच लाखांचा आहेर हेमलकसा लोकबिरादरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 06:41 AM2017-11-28T06:41:38+5:302017-11-28T06:41:51+5:30

लग्नातील हळदी समारंभाला फाटा देत आपल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नात मिळालेला ५ लाखाचा आहेर बाबा आमटेच्या हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला देऊन चिंचणी दांडेपाडा येथील मच्छीमार समाजाचे राजेश आक्र े ह्यानी सर्वांसमोर एक वेगळा

 Five lakhs of daughter's marriage to Hemlakshas Lok Biradari | मुलीच्या लग्नातील पाच लाखांचा आहेर हेमलकसा लोकबिरादरीला

मुलीच्या लग्नातील पाच लाखांचा आहेर हेमलकसा लोकबिरादरीला

googlenewsNext

- हितेन नाईक
पालघर : लग्नातील हळदी समारंभाला फाटा देत आपल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नात मिळालेला ५ लाखाचा आहेर बाबा आमटेच्या हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाला देऊन चिंचणी दांडेपाडा येथील मच्छीमार समाजाचे राजेश आक्र े ह्यानी सर्वांसमोर एक वेगळा आदर्श घालून दिला. महत्वाचे म्हणजे लग्नपत्रिकेत केलेल्या आवाहनाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जास्तीत जास्त रोख रक्कम आहेर म्हणून दिली.
डहाणू तालुक्यातील चिंचणी-दांडेपाडा येथील रहिवासी असलेले राजेश सदानंद आक्रे हे सहाय्यक अभियंता म्हणून बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कांदिवली शाखेत कार्यरत आहेत. ते आपली पत्नी राधा, कन्या पुरातन वास्तू शास्त्रज्ञ असलेली उर्वी तर डॉक्टर असलेल्या तन्वी सोबत बोरिवली येथे राहतात.
आई-वडील दोघेही शिक्षक असल्याने त्यांच्यावर लहानपणापासूनच चांगले संस्कार झाले. समाजकारणाचा वसा त्यांनी आपल्या कुटुंबिया कडून घेतला असून आजही ते आपल्या समाजाच्या अडीअडचणीला धावून जात आहेत.
आपली मोठी मुलगी उर्वी हिचा विवाह मरीन इंजिनिअर असलेल्या मुलाशी रविवारी (२६ नोव्हेंबर) रोजी आयोजित करण्यात आला होता. परमेश्वरानी आपल्याला चांगली आर्थिक सुबत्ता दिल्याने आपण आपल्या मुलीच्या लग्नातील आहेर (रोख रक्कम) हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पांतर्गत तेथील दिनदुबळ्या, गरीब, रोग्यांची सेवा करणाºया प्रकाश आमटे ह्यांच्या कडे सुपूर्द करावी असा विचार त्यांनी प्रथम आपली पत्नी व दोन मुली समोर व्यक्त केला. आणि त्या तिघीनीही कुठलेही आढेवेढे न घेता ह्या कल्पनेला तात्काळ मान्यता दिली. मुलीच्या लग्नपत्रिकेत तसे आवाहन त्यांनी केल्या नंतर समाज बांधव आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ह्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत लग्ना दरम्यान कोठलीही वस्तू न देता रोख रक्कमेचा वर्षाव केल्याने अहेरा पोटी ५ लाख रुपये जमा झाल्याचे आके्र ह्यांनी लोकमतला सांगितले.
आपल्या मच्छीमार समाजातील हळदी कार्यक्र मावर होणारी वारेमाप उधळपट्टी अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, रोखण्यासाठी ते संघटनाद्वारे सतत कार्यरत राहीले असून त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नातही हळदीचा कार्यक्र माला फाटा दिला.
आपल्या जवळील पैशाचा योग्य विनियोग व्हावा ह्यासाठी आपल्या पत्नीच्या आग्रहाखातर समाजातील प्रसिद्ध पार्श्व गायिका पुष्पा पागधरे यांना त्यांनी सढळ हस्ते ५१ हजाराची देणगी देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली होती.

आके्र कुटुंबीयांचा हा स्तुत्य उपक्र म आहे. असे देणगी दाते मला प्रथम पहावयास मिळाले
- प्रकाश आमटे, हेमलकसा

मी कधीच देवळाच्या दानपेटीत पैसे टाकीत नाही. आमटे कुटुंबियांच्या कार्याला माझ्या कडून थोडा आर्थिक हातभार लागल्याचे मला समाधान आहे.
- राजेश आक्रे , दांडे पाडा

Web Title:  Five lakhs of daughter's marriage to Hemlakshas Lok Biradari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.