पाच कोटींच्या कोनसई येथील पूलाचे भूमीपूजन

By admin | Published: March 15, 2017 01:55 AM2017-03-15T01:55:25+5:302017-03-15T01:55:25+5:30

तालुक्यातील गातेस खानिवली रस्त्यावरील कोनसई येथील पूलाचे भूमीपूजन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.

Five million rupees of land in Pond in Konsai | पाच कोटींच्या कोनसई येथील पूलाचे भूमीपूजन

पाच कोटींच्या कोनसई येथील पूलाचे भूमीपूजन

Next

वाडा : तालुक्यातील गातेस खानिवली रस्त्यावरील कोनसई येथील पूलाचे भूमीपूजन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या पूलाची उंची व रुंदी कमी असल्याने पावसाळ्यातील वाहतूक खूप गैरसोयीची होती. आता नवीन पूलामुळे ती सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
हा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा अशी मागणी या विभागातील नागरिक कायम करीत होते परंतु मी आमदार असतांना सरकार दुसऱ््या पक्षाचे होते व आमदार म्हणून असणारा निधीही कमी असल्याने सर्व मतदारसंघासाठी तो विभागला जात असे मात्र यावेळी या रस्त्यासाठी विविध माध्यमातून साधारण पाच कोटी रु पये देण्यात आले आहेत. यामध्ये रस्त्याचे रु ंदीकरण, पूल, व साईडपट्टी भराव होऊन चांगल्या दर्जाचा रस्ता होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोळे, पालघर जिल्हा सरचिटणीस नंदकुमार पाटील, वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार, मनिष देहेरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अरविंद कापडणीस, जव्हार अर्बन बँकेचे उपाध्यक्ष भरत जाधव, शामकांत मोकाशी, मंगेश पाटील,पंढरीनाथ पाटील, सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Five million rupees of land in Pond in Konsai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.