पाच महिने पगार नाही, बाइक अ‍ॅम्ब्युलन्स बंद; रुग्णांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 11:17 PM2019-09-09T23:17:01+5:302019-09-09T23:17:42+5:30

३ डॉक्टरांनी नोकरी सोडली तर २ संपावर

Five months no salary, bike ambulance closed; Patient conditions | पाच महिने पगार नाही, बाइक अ‍ॅम्ब्युलन्स बंद; रुग्णांचे हाल

पाच महिने पगार नाही, बाइक अ‍ॅम्ब्युलन्स बंद; रुग्णांचे हाल

Next

हुसेन मेमन

जव्हार : शासनाने मोठा गाजावाजा करून खेडोपाड्यातील अतिदुर्गम भागात चार चाकी अ‍ॅम्ब्युलन्स पोहचत नाही म्हणून त्या ठिकाणी बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सुरु केल्यात मात्र डॉक्टर चालकांना सुरु झाल्यापसून गेल्या पाच महिन्याचा पगार दिला नसल्यामुळे बाईक अ‍ॅम्ब्युलन्स डॉक्टरानी संप पुकराला असून ३ डॉक्टरांनी नोकरी सोडली तर २ संपावर गेले असल्यामुळे ऐन पावसाच्या काळात रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.

पालघर जिल्ह्यात मोठा गाजा वाजा करीत आरोग्यमंत्र्याच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील मासवन, मालवाडा, तलवाडा, नांदगांव व गंजाड या ५ ठिकाणी तत्काळ उपचार उपलब्ध व्हावेत म्हणून बाईक अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरु केली. या सुविधेमुळे दऱ्याखोºयातील रुग्णांना याचा फायद होत होता. ही सेवा येथे वरदान ठरली होती.

गरजेच्या वेळीच बंद
डॉक्टरांना नियमित पगार मिळत नसल्यामुळे डॉक्टर संपवर गेले असून, ज्या काळात तत्काळ अ‍ॅम्ब्युलन्सची गरज असते. अशा काळात या योजनेचा बोजवारा उडाला असून, रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. आरोग्य सेवा ही तत्पर सेवा असल्यामुळे प्रशासनाने याची काळजी घेतली पाहिजे. मात्र रुग्णांकडे प्रशासनाने काणाडोळा केला आहे.

Web Title: Five months no salary, bike ambulance closed; Patient conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.