पालघरला होणार शिक्षण विभागाची पाच कार्यालये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:19 AM2017-12-07T00:19:23+5:302017-12-07T00:19:23+5:30
जिल्हा शालेय शिक्षण विभागांतर्गत अस्तित्वात नसलेली विविध ५ कार्यालये नव्याने स्थापन करून त्या कार्यालयांच्या आस्थापनेत ठाणे शिक्षण विभागातून २० विविध पदनामावर कर्मचारी वर्ग करण्यासाठी शासनाने मान्यता दिली
हितेन नाईक
पालघर : जिल्हा शालेय शिक्षण विभागांतर्गत अस्तित्वात नसलेली विविध ५ कार्यालये नव्याने स्थापन करून त्या कार्यालयांच्या आस्थापनेत ठाणे शिक्षण विभागातून २० विविध पदनामावर कर्मचारी वर्ग करण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून तसा निर्णयही जारी करण्यात आला आहे.
शालेय शिक्षण विभागांतर्गतची विविध कार्यालये व त्यांच्या आस्थापनेवर ५७ पदे नव्याने निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पालघर कार्यालयाकडून पाठविण्यात आला होता. त्यावर याविभागांतर्गतची २० पदे ठाणे जिल्ह्यातील शालेय शिक्षण विभागाच्या कार्यालयातून वर्ग करण्यास मान्यता मिळालेली आहे. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात २ उपशिक्षणाधिकारी, नव्याने स्थापन करण्यात येणाºया लेखाधिकारी वेतन व पडताळणी पथक कार्यालयात १ कनिष्ठ लिपिक व २ शिपाई, अधिक्षक व भविष्य निर्वाह निधी पथक, प्राथमिक विभागासाठी २ शिपाई व माध्यमिक विभागासाठी १ मुख्यलिपिक, २ शिपाई, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (ऊकउढऊ) अंतर्गत ४ ज्येष्ठ अधिव्याख्याता, ६ अधिव्याख्याता, १ निम्नश्रेणी लघुलेखक, १ सांख्यिकी सहायक, ४ कनिष्ठ लिपिक व ३ शिपाई अशी एकूण पदे आहेत. पालघर येथे नव्याने स्थापन झालेल्या या कार्यालयांमध्ये मंजूर पदनामांवर कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यासाठी हे कर्मचारी ठाणे शिक्षण विभागाकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे.
मात्र ठाणे शिक्षण विभागाकडे या पदांवर पाठविण्यासाठी कर्मचारीच नसल्याने यातील काही पदे सोडली तर इतर पदे भरणार कशी असा सूर येथे निघत आहे. मे-जून दरम्यान होणाºया सर्वसामान्य बदल्या दरम्यानच ही पदे भरली जाण्याची शक्यता आहे. यामुळे पालघरच्या शिक्षणविभागाला मजबूती मिळेल.