पाच नद्यांचे वरदान तरी, पाणी टंचाईचा शाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 02:56 AM2018-04-11T02:56:11+5:302018-04-11T02:56:11+5:30

वैतरणा, तानसा, पिंजाळ, दहेर्जे व गारगावी या पाच नद्यांचे वरदान लाभलेल्या वाडा तालुक्याला आजही पाणी टंचाईचा अभिशाप कायम आहे.

Five Rivers Boost, Water Cramps Cause | पाच नद्यांचे वरदान तरी, पाणी टंचाईचा शाप

पाच नद्यांचे वरदान तरी, पाणी टंचाईचा शाप

Next

- वसंत भोईर
वाडा : वैतरणा, तानसा, पिंजाळ, दहेर्जे व गारगावी या पाच नद्यांचे वरदान लाभलेल्या वाडा तालुक्याला आजही पाणी टंचाईचा अभिशाप कायम आहे. बारमाही वाहणाऱ्या या नद्या असताना पाण्याचे नियोजन केले जात नसल्याने नऊ गावांना एप्रिलपासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पाण्याचा लाभ तालुक्याला होत नसल्याने गावातील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
सागमाळ, दिवेपाडा, टोकडेपाडा, जांभुळपाडा, भोरपाडा, रावतेपाडा, कोमपाडा, वळवीपाडा, वमाळीपाडा या गाव पाड्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सरकारी पातळीवर कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने नांदणी गावातील नागरिकांनी सोमवारी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी कुपनलिका खोदण्याचे आश्वासन मोर्चेकºयांना गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी दिले आहे. मात्र, ते पुरेशे नसून वर्तमान स्थितीमध्ये कोणती तरतुद केली असा सवाल आहे. तालुक्यात १६८ गावे आणि २०० हून अधिक पाडे आहेत. तर ८६ ग्रामपंचायती आहेत. तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांहूनअधिक आहे. वाढत्या औद्योगिककरणामुळे लोकसंख्येत वाढ होत असून त्या प्रमाणात पाण्याच्या समस्येचे निराकरण होत नसल्याने समस्येने उग्र रूप धारण केले आहे.
येथील रोलिंग मिल, शीतपेये बनविणाºया कंपन्यांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे पाण्याच्या उपसाही मोठ्या प्रमाणात होत आहे. हेही पाणी कमी पडते म्हणून खासगी कुपनलिकेतून पाण्याचा उपसा केला जातो. एकट्या कोकाकोला कंपनीला दररोज लाखो लीटर पाणी लागते. त्यांना पाणी मिळावे म्हणून वैतरणा नदीवर बंधारा बांधला आहे. मार्च महिन्यानंतर पाण्याची पातळी खाली जाते. त्यानंतर खासगी कूपनलिकेचे पाणी नेले जाते. कोकाकोला कंपनी पाण्यासाठी बंधारा बांधते तर तालुक्यातील नागरिकांच्या पाण्यासाठी बंधारे का बांधले जात नाहीत. असा प्रश्ननागरिकांना पडला आहे.
कोको कोला तुपाशी,
जनता मात्र तहाणलेली
स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही नागरिकांना शुध्द पाणी मिळू नये. ही शोकांतिका म्हणावी लागेल. अनेक सरकारे आली आणि गेली. त्यांनी टॅकरमुक्त महाराष्ट्राच्या वल्गना केल्या मात्र पालघर सारख्या आदिवासी जिल्हा अद्यापही टॅकरमुक्त झालेला नाही. कोकोकोला सारख्या कंपनीला रोज हजारो लीटर पाणी उपलब्ध होते मात्र गोरगरीब जनता तहाणेणे व्याकु ळ होते हेच वास्तव आहे.

Web Title: Five Rivers Boost, Water Cramps Cause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.