वाड्यातील पाच शाळांचा निकाल 100%
By admin | Published: June 14, 2017 02:51 AM2017-06-14T02:51:46+5:302017-06-14T02:51:46+5:30
या तालुक्यातील लिटिल एंजल्स स्कूल, गुंज आश्रमशाळा, वडवली विद्यालय, आबिटघर विद्यालय व म्हसवळ रावतेपाडा विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला.
वसंत भोईर । लोकमत न्यूज नेटवर्क
या तालुक्यातील लिटिल एंजल्स स्कूल, गुंज आश्रमशाळा, वडवली विद्यालय, आबिटघर विद्यालय व म्हसवळ रावतेपाडा विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. तिने परंपरा राखली आहे. तालुक्याचा निकाल ८७.६७ लागला आहे. परीक्षेला ३ हजार ३०१ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २ हजार ८९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
ह.वि .पाटील विद्यालय ८१.९४, आंबिस्ते हायस्कूल ९२, पी. जे. हायस्कूल ८६.८०, असनस विद्यालय ९३.२०, कंचाड ९७७.५०, नेहरोली ६६.६६, देवघर ९४.४४, स्वामी विवेकानंद विद्यालय ७४.५४, गोऱ्हे ९३.५२, डी. एल. शिंगडा विद्यालय ९२, पाली ९४.२८, परळी आश्रमशाळा ९३.७५, गारगाव आश्रमशाळा ९३.९३, ओम गुरूदेव चैतन्य विद्यालय ९६.२०, खैरे आंबिवली ९६. ८४, वाडा माध्यमिक विद्यालय ८७.०१, आदर्श विद्यालय डाकिवली ९५.८९, गुहीर आश्रमशाळा ९४.२४, अस्पी विद्यालय उचाट ६५.१५, केळठण ८१.६३, नॅशनल इंग्लिश स्कूल ९९.२१, देवगाव ७३.१३, व आंबिस्ते आश्रमशाळा ९७.५६ टक्के असा निकाल लागला आहे.
वाड्यातील आश्रमशाळांचा निकाल चांगला लागला असून त्यांची टक्केवारी ९० च्या पुढे आहे. ह.वि.पाटील विद्यालयाचा अनिकेत खांजोटे ९२.६०, वैष्णवी गायकर ९१.२० तर गायत्री जव्हारकर ९०.३० टक्के गुण मिळवून अनुक्र मे प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांकाने उत्तीर्ण झाले.
नॅशनल इंग्लिश स्कूल भाग्यश्री गायकवाड ९०.२०, अनुष्का पाटील ९०, ओमकार हरड ८८.६० टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय व तृतीय क्र मांकाने उत्तीर्ण झाले. पां.जा.हायस्कूलची सेजल बोंद्रे ही विद्यार्थीनी ९७.८० टक्के, समिक्षा पाटील ९६, नेहा भोईर ९४.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत.
लिटिल एंजल्स स्कूल ची स्नेहल डेंगाणे ९२.०९ तर निहार जाधव ९०.६९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. शारदा विद्यालय नेहरोलीचे अदिती बोंद्रे ९०.६०, जितेश चव्हाण ८७.४०, प्रतिक साळुंखे ७८.४० टक्के गुण मिळवून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. या सर्व गुणवंतांचे पालक व शिक्षकांनी अभिनंदन केले.