महिलेची छेड काढणाऱ्या आरोपीला ५ वर्ष कारावास;५ वर्षांनी झाला न्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 11:31 PM2019-05-11T23:31:49+5:302019-05-11T23:32:23+5:30

वसई गावात चार वर्षांपूर्वी एका तरुणीची छेड काढणाºया आरोपीला वसई कोर्टाने ५ वर्ष कारावास व १५,५०० रुपये दंडाची शिक्षा नुकतीच सुनावली असल्याची माहिती पालघर पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी शनिवारी लोकमतला दिली आहे.

 Five years of imprisonment for the woman who was harassed by the woman; | महिलेची छेड काढणाऱ्या आरोपीला ५ वर्ष कारावास;५ वर्षांनी झाला न्याय

महिलेची छेड काढणाऱ्या आरोपीला ५ वर्ष कारावास;५ वर्षांनी झाला न्याय

Next

वसई : वसई गावात चार वर्षांपूर्वी एका तरुणीची छेड काढणाºया आरोपीला वसई कोर्टाने ५ वर्ष कारावास व १५,५०० रुपये दंडाची शिक्षा नुकतीच सुनावली असल्याची माहिती पालघर पोलीस जनसंपर्क अधिकाऱ्यांनी शनिवारी लोकमतला दिली आहे.
वसई गावात नाटक बघण्यासाठी आलेल्या एका मैत्रिणीसोबत जात असताना या गुन्ह्यातील आरोपी यशवंत आत्माराम ठाकूर वय ४६ रा.पाणजू गाव, वसई याने तिचा हात पकडून तिला बाजूला अंधारात खेचून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते.
या संदर्भात त्यावेळी वसई पोलीस ठाण्यात दि.१६ एप्रिल २०१४ रोजी विविध कलमानव्ये गुन्हा
दाखल करण्यात आला होता.
त्याचा गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक कलगुटगी
यांनी करून आरोपींविरुद्ध पुरावा गोळा करीत त्याच्या विरुद्ध वसई न्यायालयात दोषारोपपत्रही सादर केले होते.
गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपीस शुक्रवारी वसई न्यायालयाने दोषी ठरवून त्यास ५ वर्ष शिक्षा व १५,५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यात संबंधित पोलीस व सरकारी अभियोक्ता म्हणून जयप्रकाश पाटील यांनी व पैरवी अधिकारी कवर, कोर्ट कर्मचारी तसेच पोलीस नाईक एस.वैजल आणि आर घुलांडे यांनी कामकाज पाहिले.

Web Title:  Five years of imprisonment for the woman who was harassed by the woman;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.