वसईतील पूरस्थितीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी, प्रशासनाला दिल्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 03:06 AM2018-07-14T03:06:12+5:302018-07-14T03:06:53+5:30

वसई-विरार मधील पूर परिस्थितीची राज्य सरकारने गंभीर दाखल घेतली असून मुख्यमंत्र्यांनी विधान सभेत निवेदन करताना या संदर्भात परिस्थिची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी याना सूचना केल्या होत्या.

flood situation in Vasai News | वसईतील पूरस्थितीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी, प्रशासनाला दिल्या सूचना

वसईतील पूरस्थितीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी, प्रशासनाला दिल्या सूचना

Next

पारोळ - वसई-विरार मधील पूर परिस्थितीची राज्य सरकारने गंभीर दाखल घेतली असून मुख्यमंत्र्यांनी विधान सभेत निवेदन करताना या संदर्भात परिस्थिची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकारी याना सूचना केल्या होत्या. बुधवारी दुपारी १२.३० पासून पालकमंत्री विष्णूजी सावरा यांनी वसई, नालासोपारा व विरार मधील पूर परिस्थितीची पाहणी केली. त्याच्या समवेत जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे, पालिका आयुक्त सतीश लोखंडे, आमदार पास्कल धनारे, पोलीस अधीक्षक मंजुनाथ शिंगे, उपविभागीय अधिकारी क्षीरसागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, उपस्थित होते.
वसई पूर्व मिठागर, वसंत नगरी, एव्हरशाईन सिटी, वसई पश्चिम दिवाणमान, सनसिटी , माणिकपूर, नालासोपारा पूर्व व पश्चिम भाग, विरार पूर्व पश्चिम या भागाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. मोठ्या प्रमाणात पाणी भरल्यामुळे या सर्व भागाची पाहणी अग्निशमन दलाच्या वाहनांमधूनच करण्याची वेळ पालकमंत्री व अधिकाऱ्यावर आली होती.
यानंतर झालेल्या आढावा बैठकीमध्ये महापालिकेने पाणी ओसरलेला ठिकाणी तातडीने स्वछता तसेच पाणी पुरवठा करणे, पाणी असलेल्या ठिकाणी आवश्यक त्या उपायोजना तसेच मदतकार्य करणे, तातडीने आरोग्य शिबिरे आयोजित करणे तसेच महसूल प्रशासनाने शक्य असेल तिथे तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम हाती घेऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका व जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच महावितरण च्या अधिकाºयांना वीज पुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. पुरामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तसेच जिवित हानी झालेल्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करता येईल यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत व स्थलांतरीत कुटुंबाचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे तसेच ज्या भागात अजूनही पाणी आहे तेथे तातडीने उपायोजना कराव्यात असे आदेश त्यांनी दिले आहेत.

सनसिटी रस्ता पाण्याखालीच
वसई : वसई विरार शहरातील एच प्रभागच्या अंतर्गत सनिसटी या गृहसंकुलाच्या सनसिटी - चुळणे, गास या मुख्य रस्त्यावरील पाणी अद्यापही ओसरलेले नाही, यामुळे येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक अद्याप बंदच ठेवण्यात आली आहे. दोन दिवसात पावसाचा जोर कमी होऊन थोड्या फार प्रमाणात पाणी जरी कमी झाले असले तरीही नागरिकांच्या सोयीचा असणारा हा वसई पश्चिमेकडील सनिसटी - चुळणा गास मुख्यरस्ता मात्र पाच दिवस उलटूनही अद्याप पाण्याखालीच राहिला आहे.
दरम्यान, या मुख्य रस्त्यावरून वाहने नेण्यास किंवा याभागात भटकंती करण्यास पालिकेच्या नवघर माणिकपूर विभागीय कार्यालय, वाहतूक शाखा वसई आणि माणिकपूर पोलिसांनी मज्जाव केला आहे. विशेष म्हणजे या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजुला खारजमीन असल्याने दरवर्षी पावसाळ्यात पाणी भरते.
सनिसटी - गास हा मुख्य रस्त्याचा मार्ग नागरिकांना नालासोपारा, विरार, निर्मळ वसई गाव आदी ठिकाणी लवकर पोहचण्यासाठी बºयापैकी सोयीचा आहे. मात्र पावसाळयात तो धोकादायक बनतो. असे असून देखील येथे उपाययोजना आखलेल्या नाहीत.

वसईतील आरोग्य विभागाची होणार परीक्षा

पारोळ : वसई तालुक्यातील वसई, विरार, नालासोपारा भागातील पूरस्थिती नियंत्रणात आली असली तरी पावसाच्या पाण्यामुळे आलेला कचरा व झालेला चिखल यामुळे येथे आरोग्य विभागाची परीक्षा सुरु झाली आहे. पसरलेल्या दुर्गंधीमुळे व रोगराईच्या संकटामुळे वसई विरार महापालिकेचे आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नागरीकांना मार्गदर्शन सुरु केले असून स्वच्छते विषयी जनजागरण सुरु केले आहे. अनेकांच्या घरामध्ये पाणी असल्याने समस्या वाढल्या आहेत.

१२ हजार औद्योगिक वसाहतींना बसला फटका

विरार : वसई येथे सुमारे बारा हजार औद्योगिक वसाहती असून हे राज्यातील सर्वात मोठे उत्पादन क्षेत्र मानले जाते. ११ जुलैच्या पावसामुळे आणि त्यानंतर दोन तीन दिवस पूरिस्थतीमुळे या ठिकणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वसई पूर्वेतील नवघर, गोखवारे, वालिव, सतीवली आणि गौरीपाडा या भागात तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गावर जवळपास या औद्योगिक कंपन्या असून येथे कोट्यावधीचे नकसान झाले आहे.


अग्निशमन दलाचे के ले कौतुक

अग्निशमन दलाच्या जवानांनी शनिवारी, ७ जुलै रोजी चिंचोटी येथील जंगलात अडकलेल्या पर्यटक तसेच मिठागर भागातून नागरीक व पर्यटकांच्या केलेल्या सुटकेला पालकमंत्र्यांनी उल्लेख केला.
पालिकेचे कर्मचारी व पोलिसांनी दिवस रात्र कष्ट केले.तसेच अनेक समाजसेवी संस्था व गटांनी रस्त्यावर उतरुन लोकांना धीर दिल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
 

Web Title: flood situation in Vasai News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.