आघाडीचे लक्ष नालासोपारा, वसई-विरारवरच केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 06:22 AM2018-05-27T06:22:37+5:302018-05-27T06:22:37+5:30

वसई,नालासोपारा आणि बोईसर या मतरदार संघात बविआचे वर्चस्व असून या तीनही मतदार संघात त्यांचे आमदार आहेत. त्याचप्रमाणे वसई विरार महापालिकेत ११५ पैकी १०९ नगरसेवक त्यांचे असल्याने त्यांनी आपले संपूर्ण लक्ष या तिन्ही मतदार संघावर केंद्रित केले असून घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर जोर दिला.

 The focus of the front focuses on Nalasopara, Vasai-Virarar | आघाडीचे लक्ष नालासोपारा, वसई-विरारवरच केंद्रित

आघाडीचे लक्ष नालासोपारा, वसई-विरारवरच केंद्रित

Next

वसई - वसई,नालासोपारा आणि बोईसर या मतरदार संघात बविआचे वर्चस्व असून या तीनही मतदार संघात त्यांचे आमदार आहेत. त्याचप्रमाणे वसई विरार महापालिकेत ११५ पैकी १०९ नगरसेवक त्यांचे असल्याने त्यांनी आपले संपूर्ण लक्ष या तिन्ही मतदार संघावर केंद्रित केले असून घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर जोर दिला.
पालघर मतदार संघात चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागे साठी पोटनिवडणूक होत असून राज्यात सत्तेवर असलेल्या सेना आणि भाजपने हि निवडणूक प्रतिष्ठेची करून आपल्या मंत्री, आमदार, ठिकठिकाणचे नगरसेवक यांची टीम प्रचारात उतरवली आहे. असे असले तरी या मतदार संघातील ६ पैकी ३ आमदार हे बहुजन विकास आघाडीचे असून वसई विरार महानगरपालिका सुद्धा बविआच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्यांनी या दोघांच्या भांडणात न पडता आपला ‘एकला चलो रे’ म्हणत घरोघरी जाऊन प्रचारावर भर दिला आहे. आपल्या होम पिचवर लक्ष देत असतानाच इतर ठिकाणी आपल्या नेते आणि कार्यकर्त्यांना कामाला लावल्याने दोघांच्या भांडणात बविआचा लाभ होण्याची शक्यता तिचे नेते वर्तवित आहेत. या मतदार संघात मोठमोठ्या नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा गर्जत असताना. बहुजन विकास आघाडीची हि मूव्ह विरोधकांना ही अडचणीची ठरू शकते.

च्बहुजन विकास आघाडीच्या शांत प्रचार मुळे काँग्रेस मात्र खालच्या नंबरला गेल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या बविआकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिले जाते.
च्पालघर मतदार संघात सतरा लाखांच्यावर मतदार असून त्या पैकी नालासोपारा, वसई, आणि बोईसर या तीन मतदार संघात नऊ लाख साठ हजाराच्या वर मतदार असल्याने बविआने आपला हा मतदार जपण्या बरोबरच इतर मतदार संघातून मिळणाऱ्या आघाडीवर लक्ष केंद्रित केल्याने या निवडणुकीत कोण जिंकेल यावर आता पैजा लागत आहेत.

Web Title:  The focus of the front focuses on Nalasopara, Vasai-Virarar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.