वाडा तालुक्यातील अनेक जंगलात वणवे, वन विभागाने लक्ष देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 04:26 AM2018-02-04T04:26:00+5:302018-02-04T04:26:08+5:30

तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी मालकीचे आणि वन विभागाचे जंगल आहे. पावसाने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत उगवते.जानेवारी-फेब्रुवारी मध्ये हे गवत पूर्णपणे सुकलेले असते. मात्र काही ठिकाणी समाज कंटकांमुळे तर काही ठिकाणी विजेच्या तारांमधून पडणा-या आगीच्या ठिणग्यांमुळे या जंगलातील मोठा भाग खाक झाला आहे.

The forest department and the forest department need to pay attention to the many forest areas of Wada taluka | वाडा तालुक्यातील अनेक जंगलात वणवे, वन विभागाने लक्ष देण्याची गरज

वाडा तालुक्यातील अनेक जंगलात वणवे, वन विभागाने लक्ष देण्याची गरज

googlenewsNext

वाडा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी मालकीचे आणि वन विभागाचे जंगल आहे. पावसाने जंगलात मोठ्या प्रमाणात गवत उगवते.जानेवारी-फेब्रुवारी मध्ये हे गवत पूर्णपणे सुकलेले असते. मात्र काही ठिकाणी समाज कंटकांमुळे तर काही ठिकाणी विजेच्या तारांमधून पडणा-या आगीच्या ठिणग्यांमुळे या जंगलातील मोठा भाग खाक झाला आहे. ह्यांमुळे जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर होतेच त्याच बरोबर अनेक वन्यजीव, प्राणी ह्या वणव्यांमधे मृत्यू पावतात. दुर्मिळ होत चाललेल्या पक्षी-प्राण्यांच्या प्रजातीही नष्ट होतात.
ह्या वणव्यांमुळे पाळीव जनावरांच्या चरण्याचा प्रश्न देखील गंभीर बनतो. दर वर्षी लागणार्या ह्या आगींमुळे जंगलातील औषधी वनस्पती देखील नष्ट होत आहेत.शासनाच्या कोटींच्या कोटी वृक्ष लागवाडीच्या संकल्पाला आणि स्वप्नांना या वणव्यांमुळे तडा जात असून वनविभाग मात्र त्यावर उपाय करण्यास असमर्थ ठरलेला आहे.
अनेक भागातील जंगलांमधे काही समाजकंटकांकडून ससे, रान डुकरे, मोर आणि अन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलाना आग लावली जाते.अशा समाजकंटकांचा वन विभागाने त्वरीत बंदोबस्त करण्याची गरज आहे. नाहीतर शासनाचा दर वर्षाचा कोटीच्या कोटी वृक्ष लागवडीवरील सगळा खर्च हा अशा वणव्यांमुळे वाया जाईल असे मत निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत.

दर वर्षीच्या वणव्यांमुळे जंगलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दर वर्षी रानोमाळी-डोंगरांना मोठ्या प्रमाणात आगीने वेढलेले आपण बघतो. मात्र ह्यावर उपाय शोधण्यास वन विभागाला आजपर्यंत यश आलेले नाही.शासन वृक्षारोपणासाठी करोडो रु पये खर्च करते मात्र जंगलातील अशा वणव्यांमुळे जंगलांतील वन्यजीव आणि वनस्पती नष्ट होतात.ह्यावर वनविभागाने उपाय शोधण्याची गरज आहे.
-विक्र ांत पाटील,
निसर्ग प्रेमी

Web Title: The forest department and the forest department need to pay attention to the many forest areas of Wada taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग