तुंगारेश्वर अभयारण्यातील वनसंपदा व पक्षी अधिवास धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 01:10 AM2018-12-05T01:10:32+5:302018-12-05T01:10:42+5:30
वसई पूर्व येथे असलेले तुंगारेश्वर अभयारण्य हे ८ हजार ५७० हेक्टरचे आहे. २००३ मध्ये हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. मात्र आता ते धोक्यात आलेले आहे.
वसई : वसई पूर्व येथे असलेले तुंगारेश्वर अभयारण्य हे ८ हजार ५७० हेक्टरचे आहे. २००३ मध्ये हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. मात्र आता ते धोक्यात आलेले आहे. जंगलात शिकाऱ्यांचे प्रमाण वाढले असून पशू-पक्ष्यांच्या शिकारीसह दुर्मीळ सागाच्या झाडांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात येत आहे. जंगलात वारंवार आगी लावण्यात येत आहेत. ते रोखण्यात वनविभागाला मात्र अपयश येत आहे.
तुंगारेश्वर अभयारण्यांत भूमाफियांनी अतिक्र मण करून जंगल गिळंकृत करण्यास सुरु वात केली आहे. याचा फटका अभयारण्यातील पशू-पक्षी आणि त्यांच्या अधिवाला बसतो आहे. अपुरी साधनसामग्री आणि तोकडे मनुष्यबळ यांमुळे तुंगारेश्वर अभयारण्याकडे लक्ष देण्यात अपयश येत असल्याचे वन विभागाचेच म्हणणे आहे.
तुंगारेश्वर अभयारण्यात पूर्वी मोठयÞा संख्येने वन्य प्राणी व पक्षी अधिवास करत होते. मात्र आता याकडे प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याने जंगलपट्टा नष्ट होऊन वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहेत.
एकीकडे वाढते नागरीकरण व त्यातून उद्भवणारे अतिक्रमण यामुळे वनखात्याला आवश्यक असणारे वाढीव मनुष्यबळ न मिळाल्याने हा अनर्थ घडतो आहे.
>विविध झाडे,पशू व पक्षांनी समृद्ध
या अभयारण्यात मुरुड शेख, हरडा, सागवन, सावर, पळस, शिसव, बांबू, चिंच, खैर, अर्जुन, जांभुळ, बकुळी, राजन, काकड, मोह अशा विविध प्रकारच्या वनस्पती तसेच बिबटयÞा, तरस, रानडुक्कर, रानमांजर, भेकर, कोल्हा, ससे, घोरपड, लांडगे असे विविध वन्य प्राणी तर पोपट, मोर, बगळा, घुबड, हळद्या, कोकिळा पावशा, सर्प गरुड, महाभृंगराज, शामा, जंगली पिंगळा, सुभग, पर्ण पक्षी असे २५० हून अधिक प्रजातीचे पक्षी आहेत. मात्र बेसुमार वृक्षतोड आणि शिकार यामुळे वनसंपदा आणि प्राणी-पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत असल्याची चिंता पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली.
अनेकदा जंगलात दारूभट्टी सुरू केली जाते, तर शेतीसाठी वृक्षतोड करण्यात येते. काही भूमाफियांनी जमीन गिळंकृत करण्यासाठी अतिक्रमण केले आहे, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
वृक्षतोड करून मातीभराव केला जातो आणि त्या ठिकाणी बेकायदा बांधकाम केले जाते. भूमाफिया आणि वृक्षतोड व शिकार करणाºयांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून त्यात बरेच तथ्य असल्याचे आढळून येते आहे.