माजी नगरसेविका पेगाडो समर्थकांसह भाजपात
By admin | Published: July 4, 2017 06:31 AM2017-07-04T06:31:08+5:302017-07-04T06:31:08+5:30
जनआंदोलन समितीच्या माजी नगरसेविका फ्लेविना पेगाडो यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यामुळे ख्रिस्ती समाजातील
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : जनआंदोलन समितीच्या माजी नगरसेविका फ्लेविना पेगाडो यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यामुळे ख्रिस्ती समाजातील जनआंदोलनाला फुटीची लागण लागली आहे.
वसई विरार महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत पेगाडो जनआंदोलन समितीच्या नगरसेविका होत्या. आता त्यांनी जनआंदोलनाची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत विजय मच्याडो, रॉबर्ट लोपीस, स्टीफन परेरा, डेरिक डाबरे, डेव्हिड मच्याडो, अॅल्फर्ड मच्याडो, रॉकी परेरा. विलास घोन्सालवीस, राकेश घोन्सालवीस, अजु लोपीस, निल मच्याडो यांनीही भाजपात प्रवेश केला. गोव्याप्रमाणे मुंबईत ख्रिस्ती समाज भाजपाशी जोडला जात असून ही परिवर्तनाची नांदी आहे. भविष्यात अजूनही अनेक जण भाजपशी जोडले जाणार आहेत. सर्वांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष सुभाष साटम यांनी यावेळी बोलताना दिली. जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील, सरचिटणीस हरेंद्र पाटील, जोगेंद्र प्रसाद, पश्चिम मंडल अध्यक्ष महेंद्र पाटील, आशिष जोशी, कपिल म्हात्रे यावेळी उपस्थित होते.