माजी आमदार विवेक पंडीत ठरले मुंबई विद्यापीठाचे टॉपर, M.A. ला 94 % गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 09:15 PM2021-08-06T21:15:57+5:302021-08-06T21:16:53+5:30
विद्यार्थीदशेत तथा महाविद्यालयीन शिक्षणाच्या दरम्यान त्यांना विविध चळवळीन आकर्षित केलं होतं. तर शालांत परीक्षेत म्हणजेचं एस एस सी परीक्षेत विवेक पंडित यांना फक्त 48 टक्के गुण मिळाले हो
वसई - उभं आयुष्य आदिवासी बांधवांसाठी घालवणारे श्रमजीवी संघटनेचे सर्वेसर्वा व वसईचे माजी आमदार विवेक भाऊ पंडित यांनी वयाच्या 64 व्या वर्षी मुंबई विद्यापीठातून एम. ए. (राज्यशास्त्र) परीक्षा विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. राज्यशास्त्र या विषयात त्यांनी मुंबई विद्यापीठातून प्रथम येण्याचा विशेष बहुमान प्राप्त केला असून या विशेष परीक्षेत त्यांनी 94 टक्के गुणांची कमाई केली आहे.
दरम्यान, विद्यार्थीदशेत तथा महाविद्यालयीन शिक्षणाच्या दरम्यान त्यांना विविध चळवळीन आकर्षित केलं होतं. तर शालांत परीक्षेत म्हणजेचं एस एस सी परीक्षेत विवेक पंडित यांना फक्त 48 टक्के गुण मिळाले होते आणि त्यांनतर त्यांना पदवी परीक्षेच्या दरम्यान ते सातत्याने चळवळीत व्यस्त असल्याने अवघ्या 38 टक्के गुणांसह ते पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. मात्र, आता वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अगदी नेटाने अभ्यास करून एम ए (राज्यशास्त्र) या पदव्युत्तर विशेष पदवी परीक्षेत तब्बल 94 टक्के गुण संपादित केले आहेत
आपल्या या भरघोस यशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी आमदार पंडित यांनी आपण आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी समजत असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे तर आपण सतत काहींना काही शिकत राहिल्यानं आपण विद्यार्थी असल्याची वारंवार खात्री होतच राहते. तसेच आपण इतरांना शिक्षणासाठी नेहमी प्रवृत्त करीत आलो आहोत,आता इतरांना अधिक हक्काने शिक्षणासाठी प्रवृत्त करता येईल, असेही ते म्हणाले. अर्थातच अभ्यास व शिक्षणामुळे मनाची कवाडं खुली होतात. तर अधुन मधून नवनवीन विचारांची त्यामध्ये भर देखील पडते व त्याचा एकूणच व्यक्ति मत्वाला विविधांगी फायदाही होत असतो.
विद्यार्थीदशेत असताना चळवळीमुळे अभ्यासाकडे विशेष असे लक्ष देता आलं नाही, त्यामुळे शैक्षणिक प्रगती यथातथाच राहिली खरी, परंतु खरंच आपण खूप शिकावं अशी वडिलांची मनोमन इच्छा होती. या इच्छेला काही प्रमाणात तरी न्याय देता आल्याची भावना भाऊंनी यावेळी व्यक्त केली. आपल्या बालपणातील शिक्षणाशी निगडित काही आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला आहे. आता यापुढील टप्प्यात भारताच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेतील संसदीय समित्या व अमेरिकेतील संसदीय समित्या आता विकास प्रक्रिया याचा तौलनिक अभ्यास करून शेवटी शोधनिबंध लिहिणार असल्याचं ही माजी आमदार पंडित यांनी स्पष्ट केलं.