अज्ञातांनी पेटवले माजी सरपंचाच्या शेतातील घर
By admin | Published: December 27, 2016 02:18 AM2016-12-27T02:18:32+5:302016-12-27T02:18:32+5:30
तालुक्यातील दादरकोपरा गावातील माजी सरपंच- बाबन काकड भोरे- ५५ या माजी सरपंचांचा अज्ञात चोरांनी मनात राग धरून शेतावरील घर शनिवारी रात्री पेटवून दिले.
जव्हार : तालुक्यातील दादरकोपरा गावातील माजी सरपंच- बाबन काकड भोरे- ५५ या माजी सरपंचांचा अज्ञात चोरांनी मनात राग धरून शेतावरील घर शनिवारी रात्री पेटवून दिले. यामध्ये जीवितहानी झाली नसली, तरी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अज्ञात चोरांन विरोधात त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील दादरकोपरा गावातील यापूर्वी सलग गेली २५ वर्ष माजी सरपंच असलेल्या बाबन भोरे यांची आंबा, काजूची वाडी आहे. त्यातच त्यांचे घर आहे. ते अज्ञातांनी पेटवून दिले. यामध्ये झोडणी केलेला भाताचा पेंढा, आंबा, काजू, निलगिरीची व वाडीतील इतर झाडे पेटली आहेत. यामध्ये पावसाळ्यात जनावरांना खाण्यासाठी व बुजनी करण्यासाठी राखून ठेवलेल्या भाताच्या पेंढ्यांना आग लावण्यात आली आहे. घराच्या समोर ठेवलेली लाकडे, वासे या आगीत खाक झाले आहेत. जीवित हानी झाली नाही, मात्र हजारो रु पयांचे नुकसान झाले आहे.
एकेकाळी याच घरात सरपंचांचे कुटुंब राहत होते. तर याच शेतावरील घराजवळ शेतीचे सर्व पीक साठवून ठेवण्यात येत होते. त्यावेळी जर का अज्ञातांनी शेतावरील घराला आग लावली असती तर वर्षभराचे पिक खाक झाले असते, असे माजी सरपंचाने सांगितले. शेतावरील घराला ज्या ठिकाणी आग लावण्यात आली आहे. त्या कुंपणाजवळ सुकलेल्या शेणाच्या गोवऱ्या आढळल्या. त्यामुळे आग लावण्यासाठी त्यांचाही वापर केल्याचे दिसते याची नोंद जव्हार तहसीलदार महसूल विभाग यांच्याकडे करण्यात आली आहे. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)