‘सूत्र संचलन हे एक उत्तम करिअर’ , श्याम पाडेकर यांचे प्रतिपादन
By admin | Published: January 25, 2017 04:35 AM2017-01-25T04:35:43+5:302017-01-25T04:35:43+5:30
२१ व्या शतकामध्ये भाषा आणि स्त्र संचालकास सुगीचे दिवस आले आहेत. आज आकाशवाणी, दूरर्दशन ही माध्यमे सर्व सामान्याच्या आवाक्यात आलेली आहेत.
मोखाडा : २१ व्या शतकामध्ये भाषा आणि स्त्र संचालकास सुगीचे दिवस आले आहेत. आज आकाशवाणी, दूरर्दशन ही माध्यमे सर्व सामान्याच्या आवाक्यात आलेली आहेत. त्यांच्याकडे डोळसपणे पाहणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे, अशा माध्यमातून चालणारे असंख्य कार्यक्रम आज केवळ सूत्रसंचालकामुळे यशस्वी होत आहेत. कॉमेडी ची बुलेट ट्रेन, होम मिनिस्टर, चला हवा येऊ द्या हे कार्यक्र म त्या त्या सूत्रसंचालकामुळे वेगळ्या उंचीवर पोहचले आहेत त्यामुळे या क्षेत्रात करिअर करता येण्यासारखे आहे, असे मत श्याम पाडेकर यांनी व्यक्त केले.
ते मोखाडा महाविद्यालयाच्या व्यावसाय मार्गदर्शन केंद्र व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषिक पंधरवड्या निमित्त आयोजित केलेल्या कार्यशाळेत बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.धावणे हे होते तर कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन प्रा.डॉ. मगदुम यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)