भाजपाच्या चौघांचं शिवसेनेला मतदान; तरीही महापौरपदाच्या निवडणुकीत 'कमळ' फुललं!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 01:36 PM2020-02-26T13:36:17+5:302020-02-26T13:46:34+5:30

मीरा भाईंदर महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज पार पडली.

Four BJP candidates vote for Shiv Sena Still 'lotus' blossomed in mayor election of mira bhayander | भाजपाच्या चौघांचं शिवसेनेला मतदान; तरीही महापौरपदाच्या निवडणुकीत 'कमळ' फुललं!

भाजपाच्या चौघांचं शिवसेनेला मतदान; तरीही महापौरपदाच्या निवडणुकीत 'कमळ' फुललं!

Next

पालघर - मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला. भाजपाने दोन्ही पदे आपल्याकडे कायम ठेवण्यात यश मिळवले. 95 नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या महापालिकेत भाजपाचे 61, शिवसेना 22, काँग्रेसआघाडीचे 12 नगरसेवक आहेत. महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपाच्या ज्योत्स्ना हसनाळे तर शिवसेनेचे अनंत शिर्के यांच्यात लढत झाली. त्यामध्ये भाजपाच्या ज्योत्स्ना हसनाळे यांनी विजय मिळवला. हसनाळे यांना 55 मते तर शिवसेनेच्या अनंत शिर्केंना 31 मते मिळाली. तर उपमहापौरपदीही भाजपाचे हसमुख गेहलोत विजयी झाले आहेत. 

मीरा भाईंदर महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज पार पडली. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. 95 संख्याबळ असलेल्या या निवडणुकीला 4 नगरसेवकांची गैरहजेरी होती. काँग्रेसच्या सारा अक्रम, शिवसेनेच्या अनिता पाटील व दीप्ती भट तर भाजपाचे विजय राय हे अनुपस्थित होते. एकूण 91 नगरसेवकांनी उपस्थित राहुन मतदान केलं.

महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे 20 आणि काँग्रेस आघाडीच्या 11 नगरसेवकांनी सेनेच्या अनंत शिर्के यांच्या बाजूने मतदान केले. भाजपाच्या मोरस रोड्रिंक्स, अश्विन कसोदरिया, परशुराम म्हात्रे वैशाली रकवी, यांनी शिवसेनेला मतदान केले. तरीही शिवसेना-काँग्रेसच्या अनंत शिर्केना पराभवाचा सामना करावा लागला, त्यांना 36 मते मिळाली. भाजपाच्या ज्योत्स्ना हसनाळे महापौर निवडणूक जिंकल्या. ज्योत्स्ना हसनाळे यांना 55 मते मिळाली असून शिवसेना-काँग्रेस महाविकास आघाडीच्या अनंत शिर्के यांचा 19 मतांनी पराभव केला. 

महापालिका उपमहापौर पदासाठी भाजपाच्या हसमुख गेहलोत व मदन सिंह यांच्यापैकी मदन सिंह यांनी उमेदवारी घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या मर्लिन डीसा आणि हसमुख गेहलोत यांच्यात उपमहापौर पदासाठी निवडणूक झाली. उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मर्लिन याना 35 मते मिळाली तर गेहलोत यांनी 56 मते मिळवून उपमहापौर पदाची माळ गळ्यात आपल्या पाडली. गेहलोत हे  माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांचे निकटवर्तीय आहेत. दरम्यान, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. 


 

Web Title: Four BJP candidates vote for Shiv Sena Still 'lotus' blossomed in mayor election of mira bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.