चार ब्रेथ अनालायझर मशिन्स; कोरोनात वापरण्यावर होती बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 12:21 AM2021-02-14T00:21:54+5:302021-02-14T00:22:25+5:30

NalaSopara : गरज असेल तर या मशिन्स वापरण्यात येणार असून, ती नळी फेकून दरवेळी नवीन नळी वापरणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

Four breath analyzer machines; The use of corona was banned | चार ब्रेथ अनालायझर मशिन्स; कोरोनात वापरण्यावर होती बंदी

चार ब्रेथ अनालायझर मशिन्स; कोरोनात वापरण्यावर होती बंदी

Next

- मंगेश कराळे 

नालासोपारा : वसईच्या वाहतूक विभागाकडे ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस करण्यासाठी चार ब्रेथ अनालायझर मशिन्स आहेत; पण कोरोनाकाळात या मशिन्स वापरण्यासाठी बंदी घालण्यात आल्याने त्या वसईच्या अंबाडी येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. सध्या या मशिन्स वापरण्यासाठी सर्व्हिसिंगला पाठवल्या आहेत. गरज असेल तर या मशिन्स वापरण्यात येणार असून, ती नळी फेकून दरवेळी नवीन नळी वापरणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या काळात ब्रेथ ॲनालायझर मशीनचा वापर ज्यावेळी अत्यंत गरज होती, तेव्हा करण्यात आला; पण त्याची योग्य ती काळजी घेण्यात आली. काही वेळेला प्रवाशांच्या वागण्यावरून त्याने दारू प्राशन केल्यासारखे व वास आल्यानंतरही केस करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या आधी २ ते ३ महिन्यांत ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस केल्या. ३१ डिसेंबरला  केसेस करण्यात आल्या असून, २०२१ मध्येही काही केसेस वाहतूक विभागाने केल्या आहेत.

कोरोनाकाळात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असल्याने या मशिन्स वापरल्या नाहीत; पण काही गरजेचे असेल त्यावेळी वापरण्यात आल्या आहेत. ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस केल्या आहेत. आता या मशिन्स वापरणार असून, जी नळी वापरली ती फेकून नवीन नळी प्रत्येक वेळी वापरणार. 
-विलास सुपे, वरिष्ठ पोलीस 
निरीक्षक, वाहतूक विभाग

कोरोनाकाळात दारूचा खप किती?
कोरोनाकाळात दारूचा खप हा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. अंदाजित नेहमीपेक्षा ५० टक्के दारूचा खप कमी झाल्याने राज्य सरकारचे नुकसान झाले असल्याचे दारू उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Web Title: Four breath analyzer machines; The use of corona was banned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.