मनोर-पालघर रस्त्यावर चार तास चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:21 AM2018-12-06T00:21:03+5:302018-12-06T00:21:03+5:30
रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे कूर्मगतीने होणारे काम व त्यातून उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीला कंटाळून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस व ठेकेदारच्या विरोधात संतप्त मनोरवासीयांनी बुधवारी रस्त्यावरच ठाण मांडले.
मनोर : रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे कूर्मगतीने होणारे काम व त्यातून उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीला कंटाळून सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस व ठेकेदारच्या विरोधात संतप्त मनोरवासीयांनी बुधवारी रस्त्यावरच ठाण मांडले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक चार तास जाम होऊन प्रवासी व विद्यार्थी यांचे ४ तास हाल झाले.
गेल्या दोन महिन्यांपासून या गावात रस्त्याचे कॉक्रिटकरण मंदगतीने सुरू आहे. दर दिवशी वाहतूक कोंडी होते तसेच रस्त्या च्या बाजूला दुकान घरे आहेत त्या मालकांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता रात्री जेसीबी लावून इमारत पाडली जाते पाइपलाइन तोडल्याने पाणीपुरवठा बंद असल्याने तेथील ग्रामस्थांचे गेल्या बारा दिवसांपासून प्रचंड हाल होत आहेत त्यामुळे संतप्त मनोरवासीय आज रस्त्यावर उतरले व त्यांनी बसस्थानकाजवळ ठिय्या आंदोलन केले चार तास रस्ता रोखून धरला. या ठिय्या आंदोलनात मनोर गावातील व्यापारी वर्ग ग्रामस्थ सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते महिला वर्ग सहभागी झाले होते त्या नंतर सार्वजनिक विभागाचे अधिकारी बडे अप्पर पोलीस अधीक्षक चौहान उपविभागीय पोलीस अधिकारी नाईक, जीवन प्राधिकरण अधिकारी एस एन कणसे व ठेकेदार भानुशाली यांच्या बरोबर चर्चा झाली त्यांनी ४५ दिवसात कांम पूर्ण करण्याचा आश्वासन दिले.