वसईत दरड कोसळून चारजण ढिगाऱ्याखाली अडकले; दोन जणांना वाचविण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 12:02 PM2022-07-13T12:02:49+5:302022-07-13T12:11:14+5:30

राजीवली परिसरात वाघराळपाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर बैठ्या चाळींचे अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे.

Four people got stuck under the pile Due to The pain in Vasai collapse; Success in saving both | वसईत दरड कोसळून चारजण ढिगाऱ्याखाली अडकले; दोन जणांना वाचविण्यात यश

वसईत दरड कोसळून चारजण ढिगाऱ्याखाली अडकले; दोन जणांना वाचविण्यात यश

Next

मंगेश कराळे

नालासोपारा :- वसईच्या राजावली परिसरातील वाघराळपाडा येथे बुधवारी सकाळी दरड कोसळण्याची घटना घडली आहे.  या दुर्घटनेच्या ठिकाणाखाली चारजण गाडले गेली असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलीस व वस‌ई विरार महानगरपालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनांस्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे. दरम्यान दोन जणांना वाचवण्यात यश आले असून ढिगा-याखाली आणखीन दोन जण अडकल्याची तसेच ही चारही जण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. मुसळधार पाऊस व परिसरातील अनधिकृत बांधकामामुळे जेसीबी घटनास्थळी असे पोहोचू शकत नसल्याने मदत कार्यात अडथळा येत असल्याची माहिती पालिका अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवली गावातील वाघराळपाडा भागात बुधवारी दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे. या दरडीखाली एक घर दाबले गेलेले आहे व त्यात वडील व मुलगी अडकल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. अमित ठाकूर (३५) व रोशनी ठाकूर (१४) हे दोघे बाप-लेक यात ढिगा-याखाली अडकले असून वंदना अमित ठाकूर (३३) व ओम अमित ठाकूर (१०) या आई व मुलाला वाचवण्यात यश आले आहे. घटनास्थळी पोलीस दल व अग्निशामन दल यांचेकडून माती दगडी बाजूला करण्याचे काम चालू आहे.
  
राजीवली परिसरात वाघराळपाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर बैठ्या चाळींचे अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे. दाटीवाटीने चाळी बांधण्यात आल्यामुळे घटनास्थळी मदत कार्य वेळेत पोहोचू शकले नाही. वनविभागाच्या जागेत असलेले डोंगर पोखरून येथे चाळमाफीयांनी अनधिकृत बांधकामे केली आसुन त्याला जबाबदार स्थानिक प्रशासन असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे

Web Title: Four people got stuck under the pile Due to The pain in Vasai collapse; Success in saving both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.