बसने चिरडल्या चार म्हशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 06:04 AM2018-11-16T06:04:41+5:302018-11-16T06:04:59+5:30

महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने पापडी येथे चार म्हशींना सकाळी चिरडले. त्यातील दोघींचा जागीच मृत्यू झाला, तर

Four small buffaloes crushed by bus | बसने चिरडल्या चार म्हशी

बसने चिरडल्या चार म्हशी

Next

वसई : महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसने पापडी येथे चार म्हशींना सकाळी चिरडले. त्यातील दोघींचा जागीच मृत्यू झाला, तर इतर गंभीर जखमी आहेत. सकाळी दाट धुके असल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. मे भगीरथी ट्रान्सपोर्ट मार्फत वसई विरार शहर महानगरपालिकेची परिवहन सेवा चालविली जाते. गुरूवारी सकाळी ६ वाजता वसई गांव ते अंबाडी (वज्रेश्वरी) हि बस पापडी उमेळा फाटा, साई सर्व्हीस सेंटर येथून जात असतांना अचानक बसच्या समोर चार म्हशी आल्याने त्या चिरडल्या गेल्या त्यात दोन म्हशींचा तडफडून जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या. या बसचा चालक विश्वनाथ सखाहरी वाघमारे याने या मार्गावर सकाळी मोठे धुके पडले होते. समोरून येणा-या ट्रकमुळे बिथरलेल्या म्हशी अचानक समोर आल्यामुळे हि दुर्घटना घडली. त्यांना वाचविण्याचाही मी प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले.

पापडी गुरूद्वाराजवळ अल्माका नवाब मिसाळ या तबेल्यावाल्याकडे सहा म्हशी आहेत. सकाळी चार वाजता दुध काढून झाल्यावर त्यातील चार म्हशी तबेल्याबाहेर नजर चुकवून आल्या होत्या. त्यांचा शोध घेत असतांना त्यांना ६.३० वाजता अपघात झाल्याचे त्यांना समजले.त्यांचे अडीच ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे. जखमी म्हशींवर उपचार सुरू आहेत. परंतु त्या वाचू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत वसई गांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुके असल्यामुळे तसेच म्हशी बिथरून अचानक परिवहनच्या बस समोर आल्यामुळे हा अपघात घडला आहे .अहवाल आल्यावर जर चालक दोषी आढळल्यास त्याला त्वरीत निलंबित करण्यात येईल.
- प्रीतेश पाटील,
परिवहन सभापती

परिवहन सेवा कंपनीच्या माध्यमातून इन्शुरन्स मार्फत बाधीत तबेल्यामालकाला नुकसानभरपाई देण्यात येईल.
- मनोहर सकपाळ, ठेकेदार, मे भगीरथी ट्रान्सपोर्ट
 

Web Title: Four small buffaloes crushed by bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.