चार वर्षांपूर्वी नालासोपा-यात एका विवाहितेची हत्या करणा-या देवेंद्र मिश्राला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 06:37 AM2017-10-26T06:37:26+5:302017-10-26T06:37:37+5:30
वसई : चार वर्षांपूर्वी नालासोपा-यात एका विवाहितेची हत्या करणा-या देवेंद्र मिश्रा या प्लंबरला, वसई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. पी. दिवटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
वसई : चार वर्षांपूर्वी नालासोपा-यात एका विवाहितेची हत्या करणा-या देवेंद्र मिश्रा या प्लंबरला, वसई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. पी. दिवटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नालासोपारा येथील मोरेगावात राजीव बबन शिंदे व अंजना राजीव शिंदे (३५) दाम्पत्य राहात होते. त्याच इमारतीच्या दुसºया मजल्यावर खरेदी केलेल्या सदनिकेची साफसफाई आणि टाकी बसविण्यासाठी राजीव शिंदे यांनी देवेंद्र मिश्राला बोलावले होते. २३ जानेवारी २०१३ रोजी ते सकाळी कामावर गेल्यानंतर अंजना घरी एकट्याच होत्या. ही संधी साधून आलेल्या देवेंद्रने चोरीच्या उद्देशाने अंजना यांच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने प्रहार करून त्यांना जखमी केले.
त्यानंतर, पुरावा नष्ट करण्यासाठी अंजना यांना ठार मारून त्यांचा मृतदेह घरात लपवून ठेवला, तसेच नंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाइल, रोकड असा चौदा हजारांचा ऐवज लुटून तो पसार झाला होता.