मोफत दंत चिकित्सा व वैद्यकीय शिबिर संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:42 AM2018-02-21T00:42:57+5:302018-02-21T00:43:00+5:30
डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज, राजीव गांधी कळवा हॉस्पिटल, सूर्या हॉस्पिटल, व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे मोफत वैद्यकीय व दंत महा
डहाणू : डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज, राजीव गांधी कळवा हॉस्पिटल, सूर्या हॉस्पिटल, व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे मोफत वैद्यकीय व दंत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचा शुभारंभ आमदार पास्कल धनारे, नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला.
पालघर जिल्हा हा आदिवासी दुर्गम असून अनेक रुग्ण आजारापासून त्रस्त असतात परंतु आर्थिक दुर्बलतेमुळे त्यांना उपचार घेता येत नाहीत. त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत हे शिबिर आयोजित करण्यात आले. ते चार दिवस चालणार असून याचा लाभ जास्तीतजास्त रुग्णांना होईल. अशीच शिबिरे राज्यातील विविध जिल्ह्यात घेण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे यांनी सांगितले.
दरम्यान या शिबिरास आमदार अमति घोडा, आरोग्य सहसंचालिका डॉ.सुरेखा मेंढे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कांचन वानेरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरु ण यादव, नगरसेवक विशाल नांदलसकर,नगरसेवक,वासू तुंबडे, नगरसेवक रश्मी सोनी, डॉ.पूनावाला, डॉ.बापट, लायन दिनेश रॉय,आदि मान्यवर मोठ्या संखेने उपस्थित होते.