नामांकित शाळांच्या विरोधात डहाणूत पालकांचा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 03:13 AM2018-02-11T03:13:07+5:302018-02-11T03:13:09+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू मार्फत जानेवारी महिन्यात पाचगणीतील ब्लुमिंगडे स्कूल अँड कॉलेज येथे सातवीत शिकणा-या श्रद्धा सुभाष गवळी या विद्यार्थिनीला आजारपणातून घरी आणल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.
- शौकत शेख
डहाणू : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू मार्फत जानेवारी महिन्यात पाचगणीतील ब्लुमिंगडे स्कूल अँड कॉलेज येथे सातवीत शिकणा-या श्रद्धा सुभाष गवळी या विद्यार्थिनीला आजारपणातून घरी आणल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. तर गंजाड मणीपुर येथील राकेश रामा भावर या ९ वर्र्षांच्या आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर पालकांनी निषेध मोर्चा काढुन निदर्शने केली.
या शाळा व्यावस्थापन आणि शाळांवर कारवाई झाली पाहिजे या उद्देशाने शासनाला जाब विचारण्यासाठी हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रकल्प अधिकाºयांना आदिवासी संघटनांच्यावतीने निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले.
डहाणू, तलासरी, पालघर, वसई या तालुक्यातील गरजु व हुशार विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयाकडून दरवर्षी दर्जेदार इंग्रजी शिक्षणासाठी सातारा, महाबळेश्वर, पुणे, नाशिक, जुन्नर अशा वेगवेगळ्या ठिकाणी असणाºया नामांकित इंग्लिश मीडियम शाळेत पाठवले जाते.
मात्र, चांगल्या शिक्षणासाठी पोटच्या गोळ्यांना पालक शेकडो किमी दुर पाठवत असलेतरी तेथे त्यांनी आदिवासी व मागासलेले असल्याने होणारी हेळसांड थांबलेली नसून भेटायला जाणाºया पालकांनाही तुसडेपणाने वागविले जाते अशा अनेक तक्रारी पुढे येत आहेत.
परगावी शिकणाºया प्रत्येक विद्यार्थ्यावर शासन निवासी शिक्षणासाठी ९५ हजार रुपये खर्च करते. मात्र य नामांकित शाळा आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार केले जातात. परिणामी या आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करुन त्यांची हेळसांड होत असल्याचा पालक असणाºया विलास सुमडा यांनी आरोप केला आहे. डहाणू केटी नगर येथून डहाणू प्रकल्प कार्यालयापर्यंत काढलेल्या निषेध मोर्चामध्ये पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यातील शेकडो पालकांनी एकत्र येऊन शासन व प्रशासनाचा निषेध केला.