आदिवासींचा जव्हार प्रांत कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:42 PM2019-06-01T23:42:53+5:302019-06-01T23:43:19+5:30
जव्हार : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने शनिवारी सकाळी १२ वाजता, कॉ.रतन बुधर यांच्या नेतृत्त्वाखाली विविध मागण्यांसाठी जव्हारच्या प्रांत कार्यालयावर धडक ...
जव्हार : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने शनिवारी सकाळी १२ वाजता, कॉ.रतन बुधर यांच्या नेतृत्त्वाखाली विविध मागण्यांसाठी जव्हारच्या प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा दरम्यान वन विभागा पिढ्यानपिढ्या वस्ती करणाऱ्या आदिवासींची घरे तोडली म्हणून वन विभागा विरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले होते. परंतु या मोर्चातील शिष्टमंडळाला ४ जूनची तारीख देऊन मोर्चाची बोळवण करण्यात आली.
हा मोर्चा एसटी बसस्थानक ते गांधीचौक, पाचबती नाक्यावरून शेकडो कार्यकर्त्यांसह प्रांत कार्यालयावर धडकला. मात्र वन विभाग व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोर्चेकऱ्यांना नेहमीच ठोस निर्णय मिळत नसल्याने कार्यकर्ते आक्र मक झाले होते. त्यानंतर कायकर्त्यांच्या शिष्टमंडळाला बोलावून उत्तरे दिली. परंतु समाधानकारक निर्णय न मिळाल्याने मोर्चेकºयांना ४ जूनची तारीख देण्यात आली आहे.
वन अधिकार कायद्याची अंमलबजावणी करून अनेक वर्षांपासून बांधलेल्या झोपड्या मोडू नयेत व राब करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करू नयेत. तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून, पाऊस पडेपर्यंत मोठ्या प्रमाणात रोजगार हमी सुरु ठेवावी. टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा. आदिवासी विकास विभाग व तालुका कृषी मार्फत राबविण्यात येणाºया १०८ योजनांची अमलबजावणी करावी. आदिवासी कुटुंबांना खावटी कर्ज वाटप करावे. वृद्धांना ग्रामपंचायत योजनेअंतर्गत पेन्शन योजना सुरु करावी, अशा विविध मागण्यांसाठी कार्यकर्ते आक्र मक होऊन जव्हारच्या प्रांत कार्यालयावर मोर्चा घेऊन आले होते.