नोटाबंदीविरोधात पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे

By admin | Published: January 10, 2017 05:38 AM2017-01-10T05:38:03+5:302017-01-10T05:38:03+5:30

नोटबंदी जाहीर केल्या नंतरचे ५० दिवस उलटूनही बँकांत जमा असलेली आपली पुंजी मिळत नसल्याने महिलांचे आर्थिक बजेट पार कोलमडले आहे

In front of the protest, there was a morcha in Palghar district | नोटाबंदीविरोधात पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे

नोटाबंदीविरोधात पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोर्चे

Next

पालघर : नोटबंदी जाहीर केल्या नंतरचे ५० दिवस उलटूनही बँकांत जमा असलेली आपली पुंजी मिळत नसल्याने महिलांचे आर्थिक बजेट पार कोलमडले आहे. आश्वासनांची खैरात करणाऱ्या या मोदी सरकारला महागाई कमी करण्यात अपयश आल्याने त्या आगीत होरपळलेल्या शेकडो महिलांनी जिल्हा महिला काँग्रेसने आयोजित थाळीनाद आंदोलनात सहभागी होऊन मोदी शासना विरोधातील आपला रोष व्यक्त केला.
पालघर जिल्हातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील महिलांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपली सर्व पुंजी बँकांत जमा केली होती. ५० दिवस कळ सोसा, आपली अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत होईल या त्यांनी केलेल्या आवाहनावर सर्वांनी विश्वास ठेवला होता. मात्र ५० दिवसापेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतरही कोलमडून गेलेले महिलांचे आर्थिक बजेट सावरले गेले नाही.
बँका आणि एटीएमच्या समोरील रांगा कमी होत नसल्याने हातात पैसे नाही आणि दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई याचा समतोल राखणे महिलांना असह्य झाले होते. देश-विदेशातील काळे धन बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे मोदी सरकारने
सांगितले असताना यांच्या पक्षातील अनेकांकडे कोट्यवधी रुपये सापडले आहेत. सर्वसामान्यांना आज बँकेतून ५ हजार रु पये मिळत नसताना त्यांच्या सरकार मधील एका मंत्र्यांच्या मुलांच्या लग्नात मात्र कोट्यवधी रु पयांची उधळण कशी केली जाते? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेशच्या सुदर्शना कौशिक यांनी उपस्थित केला. त्यामुळे केंद्रसरकारच्या अपयशा चा मोठा फटका ग्रामीण भागातील गरीब महिलांना मोठ्या प्रमाणात बसू लागला असून त्यांच्या संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी आज ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने जमल्या होत्या. (प्रतिनिधी)

ग्रामीण आंदोलनात महिलांची संख्या जास्त
च्महिला काँग्रेसच्या प्रभारी कौशिक,जिल्हाध्यक्षा राजश्री अहरे, तालुकाध्यक्षा मनीषा सावे,नगरसेविका उज्वला काळे,शमीम शेख, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित,जिल्हाध्यक्ष मनीष गणोरे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख,माजी नगराध्यक्ष मनोहर दांडेकर, निलेश राऊत इ. च्या वतीने थाळीनाद मोर्चा काढण्यात आला.
च्या मोर्च्याला पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेकडो आदिवासी महिलांनी उपस्थिति दर्शवली . ‘ मोदी सरकार हाय हाय’ गली गली में शोर हे मोदी सरकार चोर है’ अशा घोषणा देत पालघर हुतात्मा चौक
ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय असा थाळी नाद आंदोलन
करण्यात आले.

Web Title: In front of the protest, there was a morcha in Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.