मच्छीमारांचा मंगळवारी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:11 AM2017-07-24T06:11:07+5:302017-07-24T06:11:07+5:30
आपले दुर्लक्षित किनारे,समाज सध्या शासनाच्या चर्चेत असून विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प उभारून पंचतारांकित हॉटेल्स उभारण्यासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : आपले दुर्लक्षित किनारे,समाज सध्या शासनाच्या चर्चेत असून विकासाच्या नावाखाली मोठमोठे प्रकल्प उभारून पंचतारांकित हॉटेल्स उभारण्यासाठी आपले किनारे बड्या भांडवलदारांच्या घशात घालण्याच्या शासनाच्या धोरणाविरोधात २५ जुलै रोजी विधानभवनावर मच्छिमारांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने हा मोर्चा आयोजित केला असून जनजागृतीसाठी किनारपट्टीवरील सागरी जिल्ह्यातील सर्व गावे ढवळून काढण्यात आली आहेत. १० जुलैपासून डहाणू तालुक्यातील झाई गावापासून सुरुवात करण्यात येऊन डहणू, वाढवण, वरोर, चिंचणी, तारापूर, उच्छेली, दांडी, नवापूर, मुरबे, खारेकुरण, सातपाटी, वडराई, केळवे, एडवण, कोरे, दातीवरे, अर्नाळा, खोचिवडे, नायगाव, वसई पाचू बंदर, किल्ला, उत्तन, चौक, डोंगरी, पाली, गोराई, मनोरी, मालवणी, भाटी, मढ, वर्सोवा, मोरागाव, जुहूतारा, खारदांडा, माहीम, वरळी, कुलाबा, कफपरेड या मच्छीमारांच्या सर्व गावात जाऊन मच्छीमारांच्या अस्तित्वावर आलेली संकटांची व ती दूर करण्यासाठी आयोजित केलेल्या मोर्चाची माहिती देण्यात आली आहे. या प्रचार दौऱ्यात एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलॅसो कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस, किरण कोळी, अशोक नाईक, अशोक आंभिरे, फिलिप मस्तान, मोरेश्वर वैती, पौर्णिमा मेहेर, उज्वला पाटील, ज्योती मेहेर, मोरेश्वर पाटील, परशुराम मेहेर, रमेश मेहेर, कुमार मेहेर, जयेश भोईर, जयश्री भांजी, रेखा किणी सहभागी झाले होते.
सर्वच राजकीय नेते मच्छीमारी हा शेती समान व्यवसाय असल्याचे सांगत असले तरी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सवलती, कर्जमाफी, अल्प व्याजदराचे कर्ज देते वेळी मात्र आपले हात आखडते घेत आहेत.