जुन्या पेंन्शनचे भवितव्य १६ आॅक्टोंबरला; वित्त विभागासोबत होणाऱ्या बैठकीकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 05:48 AM2018-10-07T05:48:19+5:302018-10-07T05:48:28+5:30
जुन्या पेंन्शनच्या मागणीसाठी व राज्यातील मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना केंद्र व इतर राज्याच्या धर्तीवर जुनी कुटुंब निवृत्तीवेतन योजना लागू करावी यासाठी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचा-यांनी मुंबईतील आझाद मैदानावर २ व ३ आॅक्टोंबरला पेंन्शन आत्मक्लेश आंदोलन केले.
- सुरेश काटे
तलासरी : जुन्या पेंन्शनच्या मागणीसाठी व राज्यातील मृत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना केंद्र व इतर राज्याच्या धर्तीवर जुनी कुटुंब निवृत्तीवेतन योजना लागू करावी यासाठी राज्यातील १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचा-यांनी मुंबईतील आझाद मैदानावर २ व ३ आॅक्टोंबरला पेंन्शन आत्मक्लेश आंदोलन केले. या पेंन्शन आत्मक्लेश आंदोलनात जिल्ह्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते.
महाराष्ट राज्य जुनी पेंन्शन हक्क संघटनेने शिवनेरी ते मंत्रालय अशी पेंन्शन दिंडी आयोजित केली होती पण ऐनवेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने कर्मचाºयांना आझाद मैदानावर पेंन्शन आत्मक्लेश आंदोलन करावे लागले. या आंदोलनात विक्र म काळे, बाळाराम पाटील नागो गाणार, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, कपिल पाटील या शिक्षक आमदारांनी प्रत्यक्ष आत्मक्लेश आंदोलनात सहभाग घेतला व कर्मचाºयांना जुनी पेंन्शन योजना लागू करण्यासाठी सभागृहात लढण्याची ग्वाही दिली.
विक्रम काळे, दत्तात्रय सावंत, बाळाराम पाटील, नागो गाणार यांच्यासह अनेक आमदारांनी जोपर्यंत या कर्मचाºयांना पेंन्शन लागू होत नाही तोपर्यंत आम्ही पेंन्शन घेणार नसल्याचे जाहीर केले. शशिकांत शिंदे, नारायण पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, मनिषा कोयंदे या आमदारांसह सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनीही या आंदोलनाला भेट देऊन आपण कर्मचाºयांच्या बाजूने खंबीरपणे उभे असुन, जुन्या पेंन्शनचा विषय पिहल्याच दिवशी सभागृहात नक्की मांडू असे आश्वस्त केले.
३ आॅक्टोंबरला जुनी पेंन्शन हक्क संघटनेच्या शिष्टमंडळाला जुन्या पेंन्शनच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी १६ आॅक्टोंबर रोजी वित्त विभागासोबत बैठकीचे आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाला सर्वच शिक्षक संघटनांनी सिक्र य पाठिंबा दिला होता.या आंदोलाचे वैशिष्ट्य म्हणजे या आंदोलनात जुनी पेंन्शन योजना लागू असणारेही हजारो कर्मचारी आपल्या सहकारी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी सहभागी झाले होते.जुनी पेंन्शन हक्क संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय बंधू यांनी १ नोव्हेंबर २००५ पुर्वीचा कर्मचारी व नंतरचा नवीन कर्मचारी यांच्यातील पेंन्शनचा फरक प्रत्यक्ष जुन्या व नवीन कर्मचार्यांना विचारत व्यासपीठावरून जाहीर करताच जुन्या पेंन्शनची मागणी किती योग्य आहे याची जाणीव उपस्थितांना आणखी तिव्रतेने झाली आणी संपुर्ण आझाद मैदान पेंन्शन, पेंन्शन या आवाजाने दुमदुमून गेले.
राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी १६ आॅक्टोंबरला वित्त विभागासोबत बैठक झाल्यानंतर त्यातून जे काही निर्णय होतील त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरेल असे स्पष्ट केले. आता सर्व कर्मचार्यांचे लक्ष १६ आॅक्टोंबरला वित्त विभागासोबत होणार्या बैठकीकडे लागले आहे.हे आंदोलन यशस्वीपणे पार पडावे यासाठी राज्य मिडीया प्रमुख प्राजक्त झावरे-पाटिल, राज्य उपाध्यक्ष शैलेश पाटील, राज्य समन्वयक संभाजी पोळ, दत्ता मदने, पालघर जिल्हाध्यक्ष नितिन तिडोळे, महिला जिल्हा अध्यक्ष उत्तरा जाधव, जिल्हा सचिव महेश शेकडे, उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, प्रवक्ते दत्ता ढाकणे-बाविकर, कार्याध्यक्ष लक्ष्मण ननवरे, सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष, सचिव यांनी प्रयत्न केले.
१६ आॅक्टोंबरच्या बैठकीत चांगला निर्णय होण्याची आशा कर्मचारी व्यक्त करत आहेत. या बैठकीमुळे कर्मचाºयांच्या जुनी पेंन्शन विषयीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पेंन्शन आत्मक्लेश आंदोलनाला अनेकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल व सिक्र य सहभागाबद्दल जुनी पेंन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक बर्गे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
१६ आॅक्टोंबरच्या च्या बैठकीत राज्यातील दुर्दैवी ३८४ मयत कर्मचार्यांच्या कुटुंबियांना फॅमिली पेंन्शन योजना लागू करून या मयत कर्मचार्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा व कर्मचार्यांना जुनी पेंन्शन योजना लागू व्हावी ही अपेक्षा कर्मचारी बाळगून आहेत.
- निलेश देशमुख, कार्याध्यक्ष,
जुनी पेंन्शन हक्क संघटना