भावी महिला पोलिसांचे हाल, एका जागेसाठी ११० जणी स्पर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 06:22 AM2018-04-02T06:22:29+5:302018-04-02T06:22:29+5:30

महिला पोलीसभरतीला शनिवारपासून ठाण्यात सुरुवात झाली. शहर पोलीस दलात रिक्त असलेल्या अवघ्या ७२ जागांसाठी तब्बल ७,८७९ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या भरतीच्या पहिल्याच दिवशी तब्बल २,५०० उमेदवारांना पाचारण केले होते.

 Future women police halls, 110 people who contest for one seat | भावी महिला पोलिसांचे हाल, एका जागेसाठी ११० जणी स्पर्धेत

भावी महिला पोलिसांचे हाल, एका जागेसाठी ११० जणी स्पर्धेत

googlenewsNext

ठाणे - महिला पोलीसभरतीला शनिवारपासून ठाण्यात सुरुवात झाली. शहर पोलीस दलात रिक्त असलेल्या अवघ्या ७२ जागांसाठी तब्बल ७,८७९ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या भरतीच्या पहिल्याच दिवशी तब्बल २,५०० उमेदवारांना पाचारण केले होते.
महिलांची सुरक्षा डोळ्यांसमोर ठेवून तसेच त्यांना मुक्काम करण्यास लागू नये, म्हणून ज्या दिवशी बोलवले, त्याच दिवशी त्यांची संपूर्ण मैदानी चाचणी घेण्यात आली.
परंतु, विविध जिल्ह्यांतून आलेल्या महिला उमेदवार मात्र या तळपत्या उन्हात सावली मिळेल, तेथे विसावा घेताना दिसत होत्या. कुणी तंबूत तर रस्त्याच्या कडेला तसेच फुटपाथसह मिळेल तेथे घाणीतही क्षणभर विश्रांती घेताना दिसत होत्या. प्रसाधनगृहांच्या अपूर्णतेमुळे त्यांचे हाल होत आहेत.
ठाणे शहर पोलीस दलातील २३२ रिक्त जागांसाठी सुरू असलेल्या पोलीसभरतीत ३३ टक्के महिलांच्या आरक्षणाप्रमाणे शनिवारी ७२ जागांसाठी महिला उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ती शनिवार, सोमवार आणि मंगळवार अशी तीन दिवस सुरू राहणार असून प्रत्येक दिवशी २५०० उमेदवारांना पाचारण केले आहे.
तसेच येणाºया महिला उमेदवारांच्या मैदानी चाचणीत गोळाफेक, १०० मीटर धावणे, लांबउडी आणि ८०० मीटर धावणे असे प्रकार ज्या दिवशी बोलावण्यात आले, त्याच दिवशी त्यांच्याकडून पूर्ण करून घेण्यात येत आहेत. तर, ७२ जागांसाठी ७,८७९ उमेदवारांनी अर्ज केल्याने एका जागेसाठी जवळपास ११० उमेदवार जीवाची बाजी लावताना दिसत आहेत. यासाठी त्या तडपत्या उन्हाची ना असलेल्या दुरवस्थेची परवा न करताना दिसत आहेत. आहे, त्या परिस्थितीशी त्या दोन हात करून शारीरिक कवायती करताना दिसत आहेत.

१० एप्रिलला लेखी परीक्षा
भरती पूर्ण झाल्यावर किती उमेदवार पात्र झाले आहेत. यांची यादी येत्या ५ एप्रिलला जाहीर होणार आहे. तसेच १० एप्रिल रोजी लेखी परीक्षा साकेत पोलीस मैदानावर सकाळी होणार आहे. ती ८ एप्रिल होणार होती. पण, एमपीएससीही ८ एप्रिल रोजी असल्याने काही उमेदवारांनी परीक्षेची तारीख बदलावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार ती पुढे ढकलली आहे.

अडचणी पाहून त्यांना पुन्हा संधी

भरतीत उतरलेल्या उमेदवारांना एकावेळी आलेल्या दोन परीक्षा तसेच कौटुंबिक अडचणी किंवा अन्य काही कारणांमुळे बोलवलेल्या दिवशी येता आले नाही. तर, त्यांनी सांगितलेल्या कारणाची खातरजमा करून त्यांना पुन्हा संधी दिली आहे. साधारणत: २५-३० जणांबाबत असे घडले आहे.

डमीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
भरतीत डमी उमेदवारप्रकरणी लहू राजू केसरकर, रमेश वाम आणि स्वप्नील सुरेश जगताप या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी फसवणूक केल्याप्रकरणी हर्षल राजपूत यांनी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उमेदवाराचे चित्रण करणे पडले महागात; गुन्हा दाखल
भरती सुरूअसलेल्या साकेत पोलीस मैदानात कायदेशीररीत्या प्रवेशाशिवाय प्रवेश निषिद्ध आहे. तरीसुद्धा बुलडाण्याचा प्रकाश विश्वनाथ परिहार (२५) याने अनधिकृतपणे प्रवेश केला. तसेच फौजदारीपात्र अतिक्रमण करून चेस्ट नंबर २७२३१ असलेल्या उमेदवाराचे मैदाणी चाचणीचे छायाचित्रण करताना मिळून आला. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक रामदास बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title:  Future women police halls, 110 people who contest for one seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.