गैरप्रकाराबाबत निधी चौधरींवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:24 AM2017-07-31T00:24:02+5:302017-07-31T00:24:02+5:30

आयएएस झाल्यावर निधी चौधरी यांना प्रशिक्षणासाठी अंबरनाथ पालिकेत महिन्यासाठी पाठवले होते. या काळात त्यांनी अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली होती.

gaairaparakaaraabaabata-naidhai-caaudharainvara-gaunahaa-daakhala | गैरप्रकाराबाबत निधी चौधरींवर गुन्हा दाखल 

गैरप्रकाराबाबत निधी चौधरींवर गुन्हा दाखल 

googlenewsNext

अंबरनाथ : आयएएस झाल्यावर निधी चौधरी यांना प्रशिक्षणासाठी अंबरनाथ पालिकेत महिन्यासाठी पाठवले होते. या काळात त्यांनी अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली होती. मात्र, त्यातीलच एक भाग त्यांच्या अंगलट आला आहे. या कारवाईदरम्यान त्यांनी पालिकेच्या चार इमारती धोकादायक ठरवत कोणतीही निविदा प्रक्रिया पार न पाडता परस्पर तोडल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याात आला आहे.  या संदर्भात माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले यांनी तक्रार केली होती. 
सध्या पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या आणि श्रमजीवी संघटनेसोबत वादामुळे चर्चेच्या आलेल्या चौधरी २ मे ते १० जुन २०१४ या काळात अंबरनाथ पालिकेत मुख्याधिकारी पदावर प्रशिक्षणार्थ आल्या होत्या. आयएएस झाल्यावर त्यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. अवघ्या महिन्यात त्यांनी केवळ शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवर भर दिला होता.  अंबरनाथ पालिकेच्या मालकीच्या भाजी मार्केटसमोरील  परिचारिका इमारत, वडवली वेल्फेअर सेंटर, उलनचाळ वेल्फेअर सेंटर आणि मोरिवली येथील इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या होत्या. मात्र त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट न करता आणि इमारत तोडण्यासाठी पालिकेच्या सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता निधी चौधरी यांनी परस्पर निर्णय घेत ह्या चारही इमारती तोडल्या. एवढेच नव्हे तर इमारत तोडण्यासाठी ठेकेदार नेमण्यासाठी निविदा न काढता परस्पर एका ठेकेदाराला काम देत त्या इमारतीच्या भंगाराच्या मोबदल्यात इमारत तोडून घेतली. चौधरी यांच्यासह तत्कालीन उपमुख्याधिकारी संग्राम नार्वेकर आणि तत्कालीन नगररचनाकार कु. का. धरणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले यांनी या प्रकरणाची तक्रार शासनाकडे केली होती. तसेच बेकायदा कामे केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र त्या प्रकरणात गुन्हा दाखल होत नसल्याने त्यांनी उल्हासनगर न्यायालयात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केली.

Web Title: gaairaparakaaraabaabata-naidhai-caaudharainvara-gaunahaa-daakhala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.