रिंगरोड प्रकल्पावरून गडकरींना साकडे, सागरी महामार्गाबाबत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 02:21 AM2019-02-09T02:21:18+5:302019-02-09T02:21:47+5:30
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रिंग रोडसह मुंबई महानगरीय क्षेत्र आणि दक्षिण गुजरात जोडणारे कॉरिडोर करीता आमदार क्षितिज ठाकूर यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांची दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली.
वसई - महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील रिंग रोडसह मुंबई महानगरीय क्षेत्र आणि दक्षिण गुजरात जोडणारे कॉरिडोर करीता आमदार क्षितिज ठाकूर यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांची दिल्ली येथील कार्यालयात भेट घेतली. त्यांच्यासमवेत वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर रु पेश जाधव, माजी महापौर नारायण मानकर उपस्थीत होते.
मुंबई सह पालघर जिल्हा तसेच दक्षिण गुजरात कडे जोणारा (समुद्र महामार्ग) कोष्टल हायवे राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार असल्या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले.
कोस्टल रोड सुरु करताना विविध मुद्यांसह त्यांच्या मतदारसंघातील आणि पालघर जिल्ह्यातील काही पायाभूत सुविधांच्या समस्या त्यांनी मंत्री गडकरी यांच्या लक्षात आणून दिल्या. यासदंर्भातील निवेदन त्यांनी गडकरींना दिले. त्यामध्ये पालघर जिल्ह्याच्या पश्चिम बाजूला जोडण्याची तात्काळ गरज असून आर्थिक आणि पर्यटन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महानगरीय क्षेत्र आणि गुजरात राज्याशी जोडण्यासाठी सुधारणा करण्याची गरज असून ते कॉरिडॉरच्या विकासासाठी उत्प्रेरक म्हणून कार्य करेल आणि रहदारी कमी करण्यात मदत देखील करणार असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले.
किनाऱ्यावरील कॉरिडोर आणि रिंग रोड रस्ता अशा दोन रस्त्यावरून वाहतूक सुरू होणार आहे. यामध्ये सध्याचा एनएच -८ अस्तित्वात आहे. तर प्रस्तावित खाडी ब्रिजपासून नायगाव पूला पर्यंत मुंबई सागरी रोड म्हणून प्रस्तावित आहे.
सागरी महामार्ग पश्चिम किनारपट्टीच्या शहराशी जोडत असला तरी, टेंबीखोडा (पालघर तालुक्यातून) ते म्हारंबळपाडा (वसई तालुका) पर्यंत हा सागरी महामार्ग जोडला तर थेट मुंबई आणि वसई-विरार शहरांना हा महामार्ग जोडला जाईल. त्यामुळे पालघर तालुक्यात वसई-विरार शहराला जोडणारे प्रमुख ब्रीजचा समावेश करु न लवकरात लवकर त्यांस मंजुरी मिळावी या करिता विनंती करण्यांत आली.
याच बरोबर ३७ किमीचा शहराला चारही बाजूने जोडणारा महापालिकेने प्रस्तावित केलेला रिंग रोड एमएमआआरिडए मार्फत लवकरात लवकर सुरु करावा अशी मागणी करण्यात आली.
नायगाव पूर्व ते वसई पूर्व फेरीबोटीसाठी मागणी
सागरमाला योजने अंतर्गत ठाणे-भाईदर-वसई फेरिबोट सेवा सुरु होणार असून विविध ठिकाणी जेटींची कामे देखील सुरु आहेत. त्यासाठी उल्हास-वसई नदीतून नायगाव पूर्व ते वसई पूर्व फेरीबोट सुरु झाल्यास दैंनदीन हजारो प्रवासी नागरिकांना या सेवेचा फायदा होईल. या योजने अंतर्गत मालजीपाडा,ससुनवघर, जुचंद्र,राजावली,टिवरी ते नवघर पूर्व या भागातील नागरीकांना याचा फायदा होणार आहे.
वसई विरार शहरातील मुख्य वसई खाडीची सध्या सरासरी २१ मीटर उंची आहे आणि विकास आराखड्यानुसार प्रस्तावित रूंदी ४० मी इतकी आहे. यासाठी सदस्यस्थितीतील खाडी रु ंदिकरण व खोली वाढविणेचे काम महानगरपालिके मार्फत सुरु आहे. खाडीच्या विस्तारानेच केवळ जलवाहतूकीलाच लाभ न होता. वसई विरार शहराला पूरापासून धोका कमी करण्यास मदत होईल असे सांगितले.