गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:45 AM2017-09-01T00:45:09+5:302017-09-01T00:45:22+5:30

जिल्ह्यातील आठ तालुक्यातील सात दिवसाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ५६५ गणेश मुर्त्यांचे तर खाजगी ६ हजार ३३५ अश्या एकूण ६ हजार ९०० मुर्त्यांचे विसर्जन ‘गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला’

Ganapati running village, chain padena us! | गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला!

गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला!

googlenewsNext

पालघर : जिल्ह्यातील आठ तालुक्यातील सात दिवसाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ५६५ गणेश मुर्त्यांचे तर खाजगी ६ हजार ३३५ अश्या एकूण ६ हजार ९०० मुर्त्यांचे विसर्जन ‘गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला’ च्या भावपूर्ण वातावरणात गुरुवारी पार पडले. ह्यावेळी सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या इशाºयाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्ह्यात एकूण २ हजार ७६० सार्वजनिक तर ३५ हजार ३२३ खाजगी गणपतींच्या मुर्त्यांची स्थापना पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, वसई ह्या आठ तालुक्यात करण्यात आली होती. दीड, तीन दिवसाच्या गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडल्या नंतर पाच दिवसाच्या गणपती विसर्जना दरम्यान पडलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाºयाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागली होती. आज अधूनमधून ऊन-पावसाचा खेळ सुरू असला तरी यंत्रणेने उद्भवणाºया आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, निवासी उपजिल्हाधिकारी नवनाथ जरे,पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे ह्यांनी आपापल्या विभागांना योग्यकश सूचना जरी केल्या आहेत.
पालघर तालुक्यात सार्वजनिक १७३ तर खाजगी ५६३ मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. डहाणू तालुक्यात सार्वजनिक ५४ तर खाजगी ९१, तलासरी तालुक्यात सार्वजनिक १२ तर खाजगी १, जव्हार तालुक्यात सार्वजनिक २५ तर खाजगी ७५, मोखाडा तालुक्यात सार्वजनिक १२ तर खाजगी ८७, विक्र मगड तालुक्यात सार्वजनिक ३२ तर खाजगी ७, वाडा तालुक्यात सार्वजनिक ३ तर खाजगी १५ आणि वसई तालुक्यात सर्वाधिक म्हणजे सार्वजनिक २५४ तर खाजगी ५ हजार ४९६ गणेश मुर्त्यांचे विसर्जन आज नदी, समुद्र, धरणे व तलावात करण्यात आले. डिजेच्या कर्णकर्कश आवाजावर उच्च न्यायालयाच्या आदेशाने बंदी असल्याने पोलीस विभागाने आधीच मंडळांना आणि डिजे मालकांना सक्त ताकीद दिल्याने नाशिक ढोल व पारंपारिक वाद्यांचा वापर करुन बाप्पाला भावपुर्ण निरोप दीला. जिल्ह्यात एकूण ६ हजार ९०० मूर्त्यांचे होणारे विसर्जन व त्या अनुषंगाने लोटणारी गर्दी नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक सिंगे ह्यांच्या नियंत्रणा खाली दोन अप्पर पोलिस अधीक्षक, सात उपविभागीय पोलीस अधिकारी, १४३ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, २ हजार ५५७ पोलीस कर्मचारी, २५० होमगार्ड व सुरक्षा बलाच्या टीम तैनात करण्यात आल्या होत्या.

मनोर टेन परिसरातगौरी व गणपती विसर्जन उत्साहत
मनोर : गौरी बरोबर सात दिवसाचे गणपती टेन मनोर परिसरात विविध गणेश कुंडात पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात विसर्जन केले. या वेळी महिला सह बच्चे कंपनी गौरी च्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होते. नालसेत, टेन, मनोर, तामसइ, पोचारे, दुर्वेस, मासवन, करलगाव, येम्बुर, सावरे असे अनेक गावांत आदिवासी व कुणबी समजातीळ महिलांनी गौरी च्या अगमना पासून ते विसर्जना पर्यंत आपल्या परंपरिक पद्धतीने सर्व रीती करून गुरुवारी मोठ्या उत्साहात विसर्जन केले.

तलासरीमध्ये बाप्पाला भावपुर्ण निरोप
तलासरी : तलासरीमध्ये सात दिवसाच्या गणरायाचे आज भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले चार पाच दिवस सुरू असलेल्या पावसाने गुरुवारी उघडीप दिल्याने गणेश भक्तांनी आनंदाने नाचतगणेशाची मिरवणूक काढून विसर्जन केले. शहरातुन बारा सार्वजनिक तर १ खाजगी मुर्तीचे विसर्जन करण्यात आले. पोलिसांच्या इशाºयाने गणेश मंडळांनी डिजेला बगल देऊन बेंजोच्या वापर केला. विसर्जन वेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. तसेच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांना सहकार्य केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तलासरीत शांततेत विसर्जन पार पडले.

जव्हारमध्ये बाप्पांची जल्लेषात मिरवणूक
१काही दिवसापासून बरसणाºया धो- धो पावसामुळे गणेशोत्सवातील उत्साह काहीसा कमी झाला होता. मात्र, गुरुवारी सात दिवसाच्या गणपती विर्सजनात पावसाने उघडीन दिल्याने मोठ्या जल्लोषात नाचत, गुलालची उधळण करीत बाप्पांच्या भक्तांनी त्यांना निरोप दिला. यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणा देण्यात आल्या. २जव्हार नगर परिषदेकडून विर्सजनाची चांगली तयारी करण्यात आली होती. सुर्यतलाव येथे प्रशासनाकडून आरतीची व्यवस्था करण्यात आली होती. तलावातील पाणी प्रदुषित होऊ नये म्हणून निर्मल कलशची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच तलावात विर्सजनाकरीता होडीची व्यवस्था करून सहा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच लाईफ जॅकेटसह पाच कर्मचारी ठेवण्यात आले होते. रात्री विसर्जन निर्विघ्णपणे पार पडावे म्हणून रस्त्यापासून तलावा पर्यत मोठ मोठे फोकस लावुन लाईटची व्यवस्था करण्यात आलेली होती.३जव्हार शहरात व तालुक्यात सार्वजनिक ९९ व घरगुती २२० गणेशाचे विर्सजन झाले असून या विर्सजनात खेडोपाड्यातून व इतर ठिकाणाहून मोठ्या संख्येने भावीक जमले होते. विर्सजनात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सात दिवसाच्या विर्सजनासाठी ३ पोलीस अधिकारी, ४५ कर्मचारी व १५ होमगार्ड, ६ वनकर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असल्याची माहिती जव्हारचे पोलीस निरिक्षक घनश्याम आढाव यांनी दिली.

Web Title: Ganapati running village, chain padena us!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.