विक्रमगडात २५ गावी एक गाव एक गणपती, ४६ वर्षांपासून सुरु आहे अखंड परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 03:47 AM2017-08-27T03:47:31+5:302017-08-27T03:47:42+5:30

या शहरानजीकचे आपटी बुद्रुक हे गाव गेल्या ४६ वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वीरीत्या राबवित आहे़ संपूर्ण गावात एकाच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुन आपटी बु़ गावाने ऐक्याचा संदेश दिला आहे़

 A Ganapati is a village, a village in 25 villages in Vikramgad, continuous tradition for 46 years | विक्रमगडात २५ गावी एक गाव एक गणपती, ४६ वर्षांपासून सुरु आहे अखंड परंपरा

विक्रमगडात २५ गावी एक गाव एक गणपती, ४६ वर्षांपासून सुरु आहे अखंड परंपरा

Next

- राहुल वाडेकर ।

विक्रमगड : या शहरानजीकचे आपटी बुद्रुक हे गाव गेल्या ४६ वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वीरीत्या राबवित आहे़ संपूर्ण गावात एकाच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुन आपटी बु़ गावाने ऐक्याचा संदेश दिला आहे़ तर गणेशोत्सवापूर्वी पोलिस निरिक्षक रंजीत पवार यांनी तालुक्यातील गाव खेड्यापाड्यात एक गाव एक गणपती संकल्पना राबविण्याचे आवाहन केले होते़ त्यानुसार तालुक्यात अनेक गावात ही संकल्पना राबविली जात असून यावर्षी एक गाव एक गणपतीमध्ये वाढ झाली आहे़ तालुक्यात एकंदरीत २५ ठिकाणी ही संकल्पना राबविली जात आहे़
विक्रमगड मुख्यबाजारपेठे (शहरापासून) ८ कि़ मी अंतरावर हे गाव आहे़ एक गाव एक गणपती ही संकल्पना गावकरी सार्वजनिक नवतरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून ४६ वर्षे भक्तीभावाने व एकोप्याने राबवित आहेत़ गणेशोत्सवा मागील लोकमान्यांचा उद्देश गावकºयांनी सफल करुन दाखविला आहे व त्याअनुषंगाने इतर गावांनीही ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली असून दरवर्षी त्यात वाढ होते आहे.
१९७० साली गावातील आदिवासी बांधव नवतरुण शिक्षक व प्रतिष्ठीत नागरिक यांनी गावात एकाच गणेशमूर्तीची स्थापना केली व आज त्यांस ४६ वर्षे झाली आहेत. यातून गावातील एकजूटही कायम राहीली असे नवतरुण मंडळांचे अध्यक्ष विठठल पंळज्या उंबरसाडा यांनी लोकमतला सांगीतले़ त्याला सरपंच, पोलिस पाटील यांनीही ही संकल्पना उचलून धरली़ या अनुषंगाने सरपंच, पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांनी नव तरुण मित्र मंडळ स्थापन करुन एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली, गावातील सर्व गावकरी एकत्रित येऊन हा गणशोत्सव साजरा करतात़ या गावाची लोकसंख्या १५०० च्या आसपास असून गणेशोत्सवात गौरी नाच, ढोल नाच, तारपा नृत्य असे विविध कार्यक्रम आयोजिले जातात. याचा खर्च मंडळाच्या फंडातुन केला जातो़ संपूर्ण गावात एकच गणपती असल्यामुळे सर्व गावकरी पूजा, आरतीला एकत्र जमतात व महाप्रसादाचा लाभ घेतात़ यामुळे गावातील एकोपा कायम असून या गावाने सामाजिक एकात्मतेचा आदर्श उभा केला आहे़ या सात दिवसांच्या गणेशोत्सवाचा आनंदाने गावातील सर्व वातावरण भक्तीमय, प्रसन्न स्वच्छ, सुंदर राहाते़
त्याचप्रमाणे या आदर्शाचा दुसरा भाग म्हणजे तालुक्यातील झडपोली, गावितपाडा, सवादे, खुडेद आदी २५ गावात एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविली जात असून या गणेशोत्सवात विविध कार्यक्रम घेवून हा उत्सव मोठया भक्तीभावाने सर्वत्र साजरा केला जातो. वर्गणी ठरविणे, देणे, कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक या सगळ््यामध्ये संपूर्ण गावकºयांचे सहकार्य असल्याने हा उत्सव वेगळ््याच सहकार्याच्या आणि भक्तीच्या वातावरणात पार पडतो.

आम्ही गावामध्ये एक गाव गणपती साकारला आहे. त्याला आता ४६ वर्षे झाली आहेत. यामुळे गावात एकोपा राहातो. वातावरण भक्तीमय राहून कोणतेही तंटे, वाद, भानगडी होत नाहीत व सर्वाच एकमेकांशी चांगले संबंध जुळून गावातील शांतता कायम राहते. -विठ्ठल उंबरसाडा, अध्यक्ष

Web Title:  A Ganapati is a village, a village in 25 villages in Vikramgad, continuous tradition for 46 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.