गांधी जयंतीला चिखले किनारी स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:08 AM2017-10-02T00:08:28+5:302017-10-02T00:10:38+5:30
गांधी जयंतीनिमित्त सोमवारी चिखले समुद्रकिनारी ग्रामस्थांकडून सामूहिक स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बोर्डी : गांधी जयंतीनिमित्त सोमवारी चिखले समुद्रकिनारी ग्रामस्थांकडून सामूहिक स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या गावातील तरुणांनी २०१३ साली घोलवडच्या समुद्रातील तिवरांच्या फांद्यांना गुंडाळलेले प्लॅस्टिक काढण्यापासून स्वच्छतेला प्रारंभ केला . शिवाय विजयवाडी येथल्या दलीत वस्तीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती सामूहिकरीत्या साजरी करण्यास सुरुवात केली आहे. या मध्ये पोलीस, तटरक्षक दल, वन विभाग आणि स्थानिक मंडळांनी सहभागी होऊन उत्तम प्रतिसाद दिला होता. गतवर्षी सातफुट उंचीचे बापूंचे वाळूशिल्प साकारले बारातास स्वच्छता मोहीम राबवली. त्यात विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांनीही सहभाग नोंदवला होता. या वर्षी मेरीटाईम बोर्डाने समुद्र पर्यटन विकासाकरिता या गावाची निवड सागरतट अभियानात केल्याने पर्यटकांची संख्या वाढली त्यामुळे. चिखले बीच स्वच्छ असणे आवश्यक आहे. या करिता सार्वजनिक योगदान गरजेचे असल्याने सोमवारी दुपारी वडकती बस थांब्यापासून स्वच्छता रॅलीला काढण्यात येणार आहे. त्यानंतर विजयवाडी येथील दलीत वस्तीत गांधी जयंती साजरी झाल्यानंतर किनाºयावर सामूहिक स्वच्छता शपथ व मान्यवरांच्या मार्गदर्शनपर भाषणानंतर प्रत्यक्षा अभियानाला प्रारंभ होणार आहे.