गणेश विसर्जनापूर्वी शहापूरचे खड्डे बुजवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:03 AM2017-08-02T02:03:14+5:302017-08-02T02:03:14+5:30
शहापूर तालुक्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी मंत्रालय स्तरावर द्विवार्षिक दुरुस्ती आणि देखभाल कार्यक्र मांतर्गत ७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
शहापूर : शहापूर तालुक्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी मंत्रालय स्तरावर द्विवार्षिक दुरु स्ती आणि देखभाल कार्यक्र मांतर्गत ७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हे खड्डे गणपती विसर्जनापूर्वी बुजवायचे आहेत.
प्रशासनाकडून मंजूर झालेली ७ कोटींची रक्कम २०१७ आणि २०१८ या दोन वर्षांसाठी विभागून देण्यात आली आहे. या कामांची निविदा काढण्यात आली असून लवकरच खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरु वात होणार असल्याचे सार्वजानिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.
शहापुर तालुक्यातील शहापूर-लेनाड- मुरबाड, शहापुर- शेणवा- डोळखांब, शहापुर - शेणवा- किन्हवली- सरळगाव, शहापुर- वासिंद-शेरे- शेंद्रुण, शहापुर-किन्हवली- सो- कोथरे, शहापुर-धसई-सारंगपुरी -कोठारे- डोळखांब , शहापुर- वेहळोली - चिरव , मानेखिंड- ढाढरे, आटगाव- बिरवाडी कसारा गावातुन जाणारा रस्ता, विहिगाव- अजनुप- शिरोळ, कसारा- वाशाळा- डोळखांब, पांढरीचापाडा- बुरसुंगे , तेलंमपाडा- कातकरीवाडी रस्ता, साकुर्ली- गुंडे आळवे, शहापुर गावातील जाणारा रस्ता, वासिंद गावातून जाणारा रस्ता, कांबारे- पिवळी- वासिंद या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे प्रशासनाविरोधात नुकतेच आंदोलन करण्यात आले. तसेच गणपतीपूर्वी खड्डे बुजवले नाही तर याच खड्ड्यांत गणपतीचे विसर्जन करण्याचा इशारा देखील या वेळी देण्यात आला.