जिलेटिनचे दोन टेम्पो पकडले, जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 12:01 AM2019-03-09T00:01:34+5:302019-03-09T00:01:40+5:30

पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर यूनिटने जिलेटिन व इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरने भरलेले दोन टेम्पो अहमदाबाद -मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरुन बोईसरकडे येणाऱ्या चिल्हार फाट्यावर शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले

Gelatin caught two tempos, investigated by the District Collector | जिलेटिनचे दोन टेम्पो पकडले, जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास

जिलेटिनचे दोन टेम्पो पकडले, जिल्हाधिकाऱ्यांकडून तपास

Next

बोईसर : पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर यूनिटने जिलेटिन व इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरने भरलेले दोन टेम्पो अहमदाबाद -मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरुन बोईसरकडे येणाऱ्या चिल्हार फाट्यावर शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले असून आरोपींती दिवसभर कसून चौकशी सुरू होती.
स्थानिक गुन्हे शाखा बोईसर यूनिटचे ए.एस.आय. भरत पाटील, पोलीस नाईक सूर्यवंशी व देवेंद्र पाटील गस्त करीत असताना चिल्हार फाटा येथे या दोन टेम्पोमध्ये चौदाशे नग इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर सापडले असून ही स्फोटके गुजरातमधील परवानाधारक हिरालाल जैन यांनी नागझरी येथील दगड खाणी करीता पाठविला असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी पालघर यांचेकडून कायदेशीर बाबी संदर्भात पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
नागझरी जवळील सूर्या नदीत मासे मारण्यासाठी गणेश वनगा हा आदिवासी तरु ण जिलेटिन या स्फोटकांचा वापर करीत असतानाच त्याच्या हातात स्फोट होऊन त्यात त्याचा मृत्यु झाला होता. तर विरारच्या सायवन आणि चांदीप बंदरावरील वाळू व्यावसायिकाकडे मोठ्या प्रमाणात जिलेटिन व डेटोनेटर ही स्फोटके अनधिकृत रित्या सापडल्याची घटना ताजी आहे. त्यातच शुक्रवारी मनोर पोलीस ठाणेच्या हद्दीतील चिल्हार फाट्यावर स्पोटके ताब्यात घेण्यात आली आहे त बोईसर पुर्वेकडील नागझरी,
लालोंडे, निहे, किराट, गुंदले या भागात खदानी मध्ये जिलेटिनचा वापर होत असून नदीत मासे मारण्यासाठी बेकायदेशीर सुरू असलेल्या स्फोटकाचा वापर या घटनेमुळे धोकादायक असे जिलेटीन स्फोटक कोणालाही सहज उपलब्ध होऊ शक तात हे उघड झाले आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेले स्फोटक हे कोणत्या खदानींत पुरवली जाणार होती, त्यांच्या जवळ परवाना आहे का या दृष्टिकोनातून तपास होण गरजेचे आहे. मनोर भागातही अशा खदानी असल्याने चौकशी होणार आहे.
>लोकमत इफेक्ट
मासेमारी करण्यासाठी जिलेटीन कुठून आले त्याची सखोल चोकशी व्हावी अशी बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच पालघर पोलीस अधीक्षकांनी दखल घेवून स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले. त्या अनुषंगाने आजची करवाई करण्यात आली
> स्फोटके आणण्या संदर्भात कायदेशीर परवानगी नसेल तर त्याबाबत खात्री करून कारवाई केली जाईल.
- सिध्दवा जायबाये, सहाय्यक पोलीस निरीक्षक,
मनोर पोलीस ठाणे

Web Title: Gelatin caught two tempos, investigated by the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.