विश्वासात घ्या, योग्य मोबदला द्या
By admin | Published: July 30, 2015 10:30 PM2015-07-30T22:30:58+5:302015-07-30T22:30:58+5:30
आदिवासी, दारिद्र्यरेषेखालील विधवा यांना पंचायत समितीकडून घरकुले मंजूर होतात. तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींना घरकुले मंजूर झाली व ती बांधण्यातही आली.
विक्रमगड : आदिवासी, दारिद्र्यरेषेखालील विधवा यांना पंचायत समितीकडून घरकुले मंजूर होतात. तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींना घरकुले मंजूर झाली व ती बांधण्यातही आली. परंतु, अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या कारभारामुळे या लाभार्थ्यांना घरकुलाच्या अनुदानाच्या शेवटच्या हप्त्यासाठी पंचायत समितीमध्ये चकरा माराव्या लागत आहेत. शेवटच्या हप्त्यात घराची व शौचालयाची पाहणी करून शेवटचा हप्ता काढला जातो. ते झाले असूनही पैसे दिले जात नाही. त्यामुळे लाभार्थी हैराण झाले असून गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. लाभार्थ्यांचे घर पूर्ण बांधून झाले असेल व तसा पाहणी अहवाल असेल तर लगेच पैसे द्यावेत, असे पं.स. सदस्य रमेश दौडे यांनी सांगितले. (वार्ताहर)