पालघर जिल्ह्यात १२ वीमध्ये मुलींची बाजी
By admin | Published: May 31, 2017 05:37 AM2017-05-31T05:37:55+5:302017-05-31T05:37:55+5:30
पालघर जिल्ह्याचा १२ वीचा निकाल ८९.९२ टक्के लागला असून एकू ण ३६ हजार ६७ विद्यार्थ्यांमधून ३२ हजार ४३२ विद्यार्थी
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : पालघर जिल्ह्याचा १२ वीचा निकाल ८९.९२ टक्के लागला असून एकू ण ३६ हजार ६७ विद्यार्थ्यांमधून ३२ हजार ४३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात विद्यार्थिनींचे उत्तीर्ण व्हायचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ९२.४४ टक्के इतके आहे. तर तलासरी तालुक्यांचा सर्वाधिक निकाल ९६.६२ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील हा तालुका ग्रामिण असल्याने त्याचे महत्व वाढले आहे.
पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यातून एकूण ३६,११७ विद्यार्थ्यांनी १२ वीच्या परीक्षेसाठी चा अर्ज भरला होता. त्यातील १९ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी तर १६ हजार ५११ विद्यार्थिनी असे एकूण ३६ हजार ०६७ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. तर ५० विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. जिल्ह्यात १२ वीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण ३६ हजार ०६७ विद्यार्थ्यांपैकी वाणिज्य शाखेत १६ हजार १२४ विद्यार्थी पैकी एकूण १४ हजार ६८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल ९१.०६ टक्के असा आहे. तर विज्ञान शाखेतून ९ हजार ११४ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ६९३ विद्यार्थी ह्या शाखेतून उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९५.३८ टक्के लागला आहे. कला शाखेतून १० हजार ३१४ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ८९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ८३.२९ टक्के असा आहे.
ठाणे जिल्ह्यात ३४,५४४ विद्यार्थी विशेषसह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
ठाणे : यंदा ठाणे जिल्ह्याचा बारावीच्या परीक्षेचा ८८.६७ टक्के निकाल लागला. या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या पाहता ८४.९५ टक्के मुले तर सर्वाधिक म्हणजेच ९२.७८ टक्के मुलींनी यश मिळवले आहे. यात ३४,५४४ विद्यार्थी प्रथम श्रेणीसह विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
फेब्रुवारी - मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल मंगळवारी आॅनलाईन जाहिर झाला. ठाणे जिल्ह्यातून यंदा ८९,९२४ विद्यार्थी परिक्षेस पात्र होते. त्यापैकी ७९,७३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ३९,६६१ मुली असून ४०,०७७ मुलांचा समावेश आहे.
वसई 89.93%
वसई तालुक्यात सर्वाधिक १० हजार ३०४ विद्यार्थी तर ८ हजार ७१४ असे एकूण १९ हजार १८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यातील ९ हजार ८ विद्यार्थी तर ८ हजार ९४ असे एकूण १७ हजार १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या तालुक्यातही विद्यार्थिनींनी ५.४७ टक्के जास्त पुढे जात बाजी मारली आहे. तालुक्याचा एकूण निकाल ८९.९३ टक्के इतका लागला आहे.
100% तलासरीतील दोन शाळांचा निकाल
आज जाहीर झालेल्या १२ वीच्या निकालामध्ये तालुक्याचे जिल्ह्यामध्ये सरशी मिळवली आहे. येथील ११ उच्च माध्यमिक कॉलेज असून यातून १,५७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्या पैकी १५२२ विद्यार्थी पास झाले. कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखा मधील ८३ विद्यार्थी डिस्टिंक्शन, ग्रेट १ मध्ये ८८९ , ग्रेट २ मध्ये ४७८ तर पास क्लास मध्ये ७२ असे १५२२ विद्यार्थी पास झाले. या अकरा पैकी एम. बी.बी.आय . वेवजी व पोस्ट बेसिक आश्रम शाळा, वरवाडा या दोन शाळांचा शंभर टक्के निकाल लागला.
तालुका निहाय निकाल
92.51%
वाडा
वाडा तालुक्यातील एकूण १ हजार ५०८ विद्यार्थी तर १ हजार २६९ विद्यार्थिनी असे एकूण २ हजार ७७७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यातील १ हजार ३७० विद्यार्थी तर १ हजार १९९ विद्यार्थिनी असे एकूण २ हजार ५६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ह्या तालुक्यात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनीचा निकाल ३.६३ टक्क्यांनी जास्त लागला. तालुक्यांचा एकूण निकाल ९२.५१ टक्के लागला.
85.90%
मोखाडा
मोखाडा तालुक्यात एकूण ६३४ विद्यार्थि तर ४३७ विद्यार्थीनी असे एकूण १ हजार ०७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून ५६० विद्यार्थि तर ३६० विद्यार्थीनी असे एकूण ९२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ह्या तालुक्यात विद्यार्थिनी पेक्षा विद्यार्थ्यांनी ५.९५ टक्केवर बाजी मारली. तालुक्यांचा एकूण निकाल ८५.९० टक्के लागला.
87.84%
विक्रमगड
विक्रमगड तालुक्यात एकूण ६१७ विद्यार्थी तर ६६३ विद्यार्थिनी असे एकूण १ हजार २३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातून ५७५ विद्यार्थी तर ५०९ विद्यार्थिनी असे एकूण १ हजार ०८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.ह्या तालुक्यांचा निकाल ८७.८४ टक्के लागून विद्यार्थिनींनी ४.७२ टक्क्यांनी बाजी मारीत विद्यार्थ्यांना मागे सारले.
82.67% जव्हारचा निकाल
जव्हार तालुक्यात एकूण ५७५ विदयार्थी तर ५५० विद्यार्थिनी असे एकूण १ हजार १२५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यातून ४८५ विद्यार्थी तर ४४५ विद्यार्थिनी असे एकूण ९३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा एकूण निकाल ८२.६७ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यात हा निकाल सर्वात कमी आहे.
96.62%
तलासरी
तलासरी तालुक्यात ८८३ विद्यार्थी तर ७१४ विद्यार्थिनी असे एकूण १५९७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातून ८४९ विद्यार्थी तर ६९४ विद्यार्थिनी असे एकूण १ हजार ५४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या तालुक्यात विद्यार्थिनीनी बाजी मारत १.५ टक्क्याने मुलांपेक्षा पुढे राहिला. जिल्ह्यात या तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९६.६२ टक्के लागला आहे.
91.54%
डहाणू
डहाणू तालुक्यात एकूण २५५४ विद्यार्थी तर १९७१ विद्यार्थिनी असे एकूण ४५२५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातून २ हजार २९७ विद्यार्थी तर १ हजार ८४५ विद्यार्थिनी असे एकूण ४ हजार १४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तालुक्यातही विद्यार्थिनीनी बाजी मारत विद्यार्थीपेक्षा ३.६७ टक्केवारीने पुढे राहिल्या आहेत. तालुक्याचा एकूण निकाल ९१.५४ टक्के इतका लागला आहे.
87.75%
पालघर
पालघर तालुक्यात एकूण २४२७ विद्यार्थी तर २२९३ विद्यविर्थनी असे एकूण ४ हजार ७२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील २ हजार २५ विद्यार्थी तर २ हजार ११७ विद्यार्थी असे मिळून ४ हजार १४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. येथेही विद्यार्थिनींनी बाजी मारत विद्यार्थ्यांपेक्षा ८.८८ टक्क्याने पुढे गेल्या आहेत. तालुक्याचा एकूण निकाल ८७.७५ टक्के इतका लागला आहे.