पालघर जिल्ह्यांत मुलींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 11:57 PM2019-06-08T23:57:33+5:302019-06-08T23:57:48+5:30
वसई तालुक्याचा निकाल सर्वाधिक ७९.७७ । विक्रमगड सर्वात कमी ४७.६० टक्के
पालघर : पालघर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ७१.७५ लागला असून यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यातील मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ७५ टक्के आहे तर मुलांची टक्केवारी ६८.९२ आहे, या परीक्षेत ८ तालुक्यामधून बसलेल्या ५७ हजार ९२२ विद्यार्थ्यांपैकी ४१ हजार ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
वाडा तालुक्यातून ३२६६ मुले परीक्षेला बसले होते यापैकी २००८ मुले उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ६१.३९ इतकी आहे. मोखाडा तालुक्यातून १२८४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ७६० मुले उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ५९.१९ आहे. विक्रमगड तालुक्यातून २९३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी १,३९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांची टक्केवारी ४७.६ आहे. जव्हार तालुक्यातून २२४६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते तर यातून १२७७ मुले उत्तीर्ण झाले या तालुक्याची टक्केवारी ५६.८६ आहे. तलासरी तालुक्यातून ४ हजार ७१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी २३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तालुक्याची टक्केवारी ५६.७२ इतकी आहे. डहाणू तालुक्यातून पाच हजार ९२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते यापैकी ३७७२ विद्यार्थी पास झाले या तालुक्याची टक्केवारी ६३.५३ इतकी आहे तर पालघर तालुक्यातून ८१७० मुलांनी दहावीची परीक्षा दिली. यामध्ये ६०९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तालुक्याची टक्केवारी ७४.५ आहे.
जिल्ह्यामध्ये पालघर तालुका हा टक्केवारीमध्ये द्वितीय क्रमांकावर आहे तर वसई तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेस बसले होती त्यांची आकडेवारी तीस हजार वीस इतकी असून यामध्ये २३ हजार ९४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तालुक्याची टक्केवारी ७९.७७ टक्के तर इतकी आहे. वाडा तालुक्यातील ३३ शाळा मोखाडा तालुक्यातील १८ शाळा विक्रमगड तालुक्यातील २७ जव्हार तालुक्यातील ३४ तलासरी तालुक्यातील ४३ डहाणू ३५६ पालघर मधील ८८ वसई मधील २५२ अशा आठही तालुक्यातील एकूण ५५१ शाळांमधून ४१ हजार ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
आठही तालुक्यातून २१ हजार ५७८ मुले तर १९ हजार ९८१ मुली असे एकूण ४१ हजार ५९८ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये आठही तालुक्यांची जिल्ह्याची मुलांची आकडेवारी ही ६८.९२ असून मुलींची आकडेवारी ही ७५.०८ आहे.
तालुकानिहाय निकाल
तालुका टक्केवारी
वसई ७९.७७ %
पालघर ७४.५ %
डहाणू ६३.५३ %
वाडा ६१.३९ %
मोखाडा ५९.१९ %
जव्हार ५६.८६ %
तलासरी ५६.७२ %
विक्रमगड ४७.६० %