तापाच्या रुग्णांची त्वरित माहिती द्या, नागरिकांमध्ये पुन्हा कोरोनाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:41 PM2021-03-12T23:41:24+5:302021-03-12T23:42:07+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचे खासगी डाॅक्टरांना आदेश : ग्रामीण भागातील काेराेनावाढीने चिंता

Give immediate information to fever patients, fear of corona again among citizens | तापाच्या रुग्णांची त्वरित माहिती द्या, नागरिकांमध्ये पुन्हा कोरोनाची भीती

तापाच्या रुग्णांची त्वरित माहिती द्या, नागरिकांमध्ये पुन्हा कोरोनाची भीती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : ग्रामीण भागातील ॲॅलोपथी, होमिओपॅथीसह बोगस पदवीधारक डॉक्टरांकडून ताप, खोकला, सर्दी अशा कोरोनासदृश लक्षणे आढळणाऱ्या रुग्णावर उपचार केले जात असल्याने ग्रामीण भागात काेराेना झपाट्याने पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक पावले उचलून सर्व डॉक्टर आणि खाजगी रुग्णालये, लॅब यांनी तापाच्या रुग्णांची माहिती देणे बंधनकारक केले आहे. पालघर जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात काेराेनाची आकडेवारी वाढत आहे. १ फेब्रुवारीला ७२ काेराेनाबाधितांची संख्या शुक्रवारपर्यंत १३० वर पाेहाेचल्याने चिंता वाढली आहे.
जव्हार तालुक्यात ३७ विद्यार्थ्यांसह ३ शिक्षक व अन्य सेंट्रल किचनमधील १६ कर्मचारी असे ५६ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. काही विद्यार्थ्यांना ताप, खोकला आल्यानंतर त्यांच्या तपासणीनंतर त्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह ५६ लोकांना बाधा झाल्याचे वास्तव समोर आले. आश्रमशाळा व्यवस्थापनाने मुलांची तपासणी वेळीच केल्याने ही बाब उघड झाली आहे; पण आजही ग्रामीण भागातील ताप, सर्दी, खोकल्याचे हजारो रुग्ण गाव-पाड्यातील डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घेत आहेत. त्यांची कोरोनाबाबतची अँटिजन, अँटिबॉडी, आरटीपीसीआर आदी चाचण्या केल्या जात नसल्याने बाधितांची नेमकी संख्या समोर येणे शक्य होत नाही. 

बाधितांचा शोध घेण्यासाठी मोबाइलमध्ये उभारलेली ॲप्स आणि जीपीएस यंत्रणा ही आताच्या घडीला बंद असल्याने  जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यातील मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, रुरल मेडिकल असोसिएशन, बीएएमएस ग्रॅज्युएट असोसिएशनना पत्र पाठवले आहे. या पत्रात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तापाच्या रुग्णांचे  सर्वेक्षण आवश्यक आहे. त्यामुळे  खाजगी आरोग्य संस्थेत, क्लिनिकमध्ये तापाचे रुग्ण तपासणीसाठी आल्यास जवळच्या कोविड केअर सेंटर, हेल्थ सेंटर येथे अँटिजेन, आरटीपीसीआरसाठी पाठवून त्यांचे नाव, नंबर आणि पत्ता ई-मेलद्वारे cspalghar@gmail.com वर तत्काळ पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

विनवळच्या आठवडा बाजारावर बंदी

जव्हारमध्ये सात नवे काेराेना रुग्ण : नागरिकांमध्ये पुन्हा भीती

जव्हार : कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे. त्यामुळे विनवळ ग्रामपंचायतीने गावातील आठवडा बाजारावर बंदी घालण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. काही दिवसांपूर्वी विनवळ येथील सेंट्रल किचनचे १६ कर्मचारी व शुक्रवारी तीन कर्मचारी असे एकूण १९ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे विनवळ ग्रामपंचायतीने विनवळ कार्यक्षेत्रात आठवडे बाजार भरविण्यास सक्त मनाई केली आहे. ग्रामपंचायत क्षेत्राबाहेरील व्यक्तींना ग्रामपंचायत क्षेत्रात येण्यास मनाई करण्यात आली आहे. 

दरम्यान, शुक्रवारी नवीन सात रुग्णांची भर पडली असून, यातील विनवळ येथील एक अधीक्षक व दोन सेंट्रल किचनचे कर्मचारी तर हिरडपाडा शाळेतील तीन रुग्ण व इतर एक असे नवीन सात रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. सद्य:स्थितीत जव्हार तालुक्यात ७९ रुग्णांची नोंद केली आहे.

Web Title: Give immediate information to fever patients, fear of corona again among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.