वाड्यातील गोधडीची ऊब सातासमुद्रापलीकडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:07 PM2020-02-11T23:07:41+5:302020-02-11T23:07:44+5:30

हमरापूरच्या महिला बचत गटाचा उपक्र म : पारंपरिक मराळमोळ्या गोधडीला प्रसिद्धीचे वलय

Godhadi warmth in the palace beyond the sea! | वाड्यातील गोधडीची ऊब सातासमुद्रापलीकडे!

वाड्यातील गोधडीची ऊब सातासमुद्रापलीकडे!

googlenewsNext

वसंत भोईर।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : तालुक्यातील हमरापूर येथील ओमगुरु देव महिला बचत, भाग्यलक्ष्मी महिला बचत गट, प्रगती ‘अ’ महिला बचत गट, एकवीरा महिला बचत गट आणि साईलीला महिला बचत गट या पाच महिला बचत गटांनी मिळून तयार केलेली गोधडी साता समुद्रापलीकडे गेली असून या गोधडीची उब इंग्लंड, अमेरिकेतील नागरिकही घेत आहेत. तर या गोधडीला तेथील नागरिकांनी ‘हमरापूरची राणी’ हे नावही बहाल केले आहे. त्यामुळे या पारंपरिक मराठमोळ्या गोधडीला चांगलेच प्रसिद्ध वलय प्राप्त होत आहे.
दीड हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या हमरापूर या गावातील महिला बचत गट हे नेहेमीच कापडी पिशवी, कपड्यांपासून पायपुसणी, लोकरीचे तोरण, रुमाल, महिलांचे मेकअपचे साहित्य अशा नावीन्यपूर्ण वस्तू तयार करून त्याची विक्री करतात. तीन वर्षांपासून या बचत गटातील दहा महिलांनी एकत्र येत वैशिष्ट्यपूर्ण गोधडी शिवून तिची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
हमरापूर गावापासून अवघ्या दोन किमी. अंतरावर इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज येथे मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक येत असतात. त्यांच्यापर्यंत येथील महिलांनी ही गोधडी पोहचविली आणि अमेरिकामधील पर्यटकांना या गोधडीचा उब चांगलीच भावली. थंडीपासून संरक्षण करणाऱ्या अन्य वस्त्रांपेक्षा या गोधडीतून चांगली ऊब मिळत असल्याने त्यांनी या बचत गटाकडून शंभरहून अधिक गोधड्या विकत घेत त्या सातासमुद्रापार आपल्या देशातही नेल्या आहेत.

माजी मंत्री दीपक सावंत यांची प्रकल्पाला भेट
च्या मराठमोळ्या गोधडी प्रकल्पाविषयी माहिती मिळताच शिवसेना नेते,
माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी मंगळवारी (दि. ११) हमरापूर येथे सपत्नीक येवून या प्रकल्पाला भेट देवून बचत गटातील महिलांशी संवाद साधला आणि प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेऊन त्यांच्या समस्या
जाणून घेतल्या.
या बचत गटांचे लवकरच विलेपार्ले येथे प्रदर्शन भरवणार असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या प्रकल्पाविषयी माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी येणाºया अडचणी उदा. गोधडीसाठी लागणारा कच्चा माल, कापूस, कपडा व मार्केटिंगसाठी शासनाकडून सहकार्य मिळावे, अशी विनंती करणार असल्याचे ते म्हणाले.
वजनाला हलकी असलेली ही गोधडी : चांगल्या दर्जाचा रंगीत कपडा घेऊन सहा फूट लांब, सहा फूट रुंद अशी या कपड्यापासून मोठी पिशवी तयार केली जाते. या पिशवीमध्ये चांगल्या दर्जाचा रजईचा दीड ते अडीच किलो कापूस भरला जातो. या गोधडीला सुताचा धागा घेऊन हाताने शिवली जाते. वजनाला हलकी असलेली ही गोधडी अत्यंत कमी तापमानामध्ये तर फार उपयुक्त आहेच, पण अधिक तापमानामध्येही या गोधडीचा वापर केल्यास कुठलाही त्रास होत नाही. एका गोधडीसाठी ६०० ते ७०० रुपये खर्च येतो आणि ती १००० ते १२०० रुपयांपर्यंत विकली जाते. या गोधडीची धुलाई वारंवार करता येत असून ती चार ते पाच वर्षे सहज टिकते असे ओमगुरु देव बचत गटाच्या सचिव हर्षाली पाटील यांनी सांगितले.

Web Title: Godhadi warmth in the palace beyond the sea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.