अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरील गांधी स्मारकाला येणार अच्छे दिन

By admin | Published: June 1, 2017 04:33 AM2017-06-01T04:33:09+5:302017-06-01T04:33:09+5:30

अर्नाळा समुद्रकिनारी अर्नाळा-वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर महात्मा गांधींच्या अस्थि विसर्जनानंतर साकारण्यात आलेल्या स्मारकाच्या

Good day coming to Gandhi Memorial at Arnala beach | अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरील गांधी स्मारकाला येणार अच्छे दिन

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरील गांधी स्मारकाला येणार अच्छे दिन

Next


शशी करपे/लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : अर्नाळा समुद्रकिनारी अर्नाळा-वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर महात्मा गांधींच्या अस्थि विसर्जनानंतर साकारण्यात आलेल्या स्मारकाच्या दुर्दशेचा वृत्तांत लोकमतने प्रसिद्ध करताच त्याची दखल ग्रामपंचायत व पोलिसांनी तातडीने घेतली व या स्मारकाची नित्य स्वच्छता केली जाईल व ती राखण्यासाठी सुरक्षारक्षकही नेमला जाईल, अशी लेखी ग्वाही दिली.
या स्मारक परीसरात दारुडे पार्ट्या झोडतात. बेवारस कुत्र्यांनी आश्रय घेतला आहे. साफसफाई तर होतच नसल्याने चोहोबाजूंला घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यावर लोकमतने प्रकाशझोत टाकताच याठिकाणी नियमित स्वच्छता केली जाईल आणि कायमस्वरुपी सुरक्षा रक्षक तैनात केला जाईल, असे लेखी पत्र पोलीस व ग्रामपंचायतीने समाजसेवक दत्तात्रेय कराळे यांना दिले आहे.
राष्ट्र्पिता महात्मा गांधी यांच्या निधनानंतर त्यांच्या ८ जानेवारी १९४८ रोजी अस्थींचे अर्नाळा समुद्रकिनारी असलेल्या अर्नाळा-वैतरणेच्या त्रिवेणी संगमावर विसर्जन करण्यात आले होते. त्याच्या स्मृत्यर्थ त्याठिकाणी एक स्मारक बांधण्यात आले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्याचे पावित्र्यच धोक्यात आले होते.
गांधी स्मारकाच्या वास्तूची निगा राखण्यासाठी कायमस्वरुपी रखवालदार नाही. त्यामुळे याठिकाणी दारुडे खुलेआम दारु पित बसलेले असतात. स्मारकाच्या आवारात दारुच्या रिकाम्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची रिकामी पाकिटे फेकलेली आढळून येतात. भिकारी, गर्दुल्ले यांचा याठिकाणी नेहमी राबता असतो. भटक्या कुत्र्यांनी तर स्मारक आपले निवासस्थान बनवले आहे. नियमित सफाई केली जात नसल्याने केरकचरा साचलेला दिसून येतो. मात्र, स्मारकाची कुणीच निगा राखत नसल्याने त्याचे पावित्र्य धोक्यात आले आहे. ते राखावे अन्यथा आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय कराळे यांनी दिला होता. तो ही या लेखी ग्वाही मुळे कारणी लागला आहे, आता त्याप्रमाणे घडते कधी याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Web Title: Good day coming to Gandhi Memorial at Arnala beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.