सुक्या मासळीच्या बाजाराला ‘अच्छे दिन’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 11:44 PM2019-05-08T23:44:14+5:302019-05-08T23:44:37+5:30
सध्या सर्वत्र मे हीटचे (उन्हाचें) चटके बसले असले तरीसुध्दा महिन्यानंतर सुरु होणा-या पावसाची चाहुल मात्र आतापासूनच लागू लागली आहे.
- राहुल वाडेकर
विक्रमगड - सध्या सर्वत्र मे हीटचे (उन्हाचें) चटके बसले असले तरीसुध्दा महिन्यानंतर सुरु होणा-या पावसाची चाहुल मात्र आतापासूनच लागू लागली आहे. मांसाहारी नागरिंकांना मासेमारी बंदीच्या पावसाळयाच्या कालावधीत हवीहवीशी वाटणारी सुकी मासळी खरेदी करण्यासाठी विक्रमगडच्या आठवडे बाजारामध्ये गर्दी होऊ लागल्याने बाजाराला ‘अच्छे दिन’ आले आहे.
पावसाळा आला की विक्रमगड व तालुक्यातील आजूबाजू खेडया पाडयातील शेतकरी वर्ग शेतीपूर्व कामाला लागतो़त्यामुळे त्याला पावसाळयात शेती हंगाम चालू झाल्यावर बाजारहट (खरेदी) करण्यास शेतीकामांमुळे वेळ मिळत नाही. त्यामुळे तो पावसाळयापूर्वीच तीन ते चार महिने पुरेल असा मसाला, मिरची, हळद, कांदा, बटाटा, कडधान्य अशा अनेकविध गरजेच्या वस्तू खरेदी करून त्याचा साठा करून ठेवतात. त्याचबरोबर विविध प्रकारची सुकी मच्छीही भरून ठेवतो. चार महिने या वस्तुंचा आस्वाद घेत असतो, पावसाळया आधी केल्या जाणाऱ्या या चार महिन्याच्या खरेदीला आगोट असे म्हणतात. यंंदा पाऊस लवकर येणार असल्याचे संकत मिळाल्याने शेतकरी वर्गाने आपल्या शेतामध्ये पूर्व मशागतीचे कामे तसेच राब-राबणीची सुरु केली आहे.
काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपल्याने ग्रामीण भागातील शेतक-यांनी, अगोटाच्या खरेदीला सुरुवात केली आहे़ प्रत्येक गाव-पाडयांमध्ये भरणा-या आठवडी बाजारात मान्सूनपूर्व खरेदीसाठी शेतक-यांची झुंबड उडतांना दिसत आहे़ मात्र महागाईचा भस्मासूर डोक्यावर मांडरत असतांनाही खरेदी मात्र केली जात आहे़ कारण चार महिनें पाऊस चालू झाल्यावर येथे भाजी आणण्यापासून ते सर्वच गोष्टीकरीता अडचणी निर्माण होत असतात ग्रामीण भागात पावसाळयात पाहीजे ती वस्तू मिळत नसते.
पावसाळयाच्या जीवनावश्यक वस्तंूबरोबरच सुक्या मासळीची खरेदीही जोदारपणे या महिन्यात सुरु असल्याने व्यापाराबरोबरच सुक्या मासळी विक्रेत्यांचा धंदा तेजीत असतो.
सुक्या मासळीलाच ग्रामीण भागात मावरा असे म्हणतात़ सातपाटी, मुंबई, वसई, केळवे, डहाणू आदीविध भागातून मावरे विक्रेत्या महिला खास करुन खत्तलवाडीहुन सुके खारे घेऊन विक्रमगड व परिसरातील दादडे, तलवाडा, साखरे, आलोंडा, मलवाडा, उपराळे, भोपोली आदी खेडया पाडयात गावात आठवडी बाजारात येऊन आपली दुकाने थाटत असल्याने अगर इतर दिवशीही डोक्यावर टोपले घेऊन गावो गावी फिरत असल्याने मावरे खरेदीकरण्यासाठी ग्रामीण भागातील मुख्यत्वे खेडयापाडयातील ग्राहकांची, महिलांची एकच झुंबड उडत आहे़
मावर ही झाली यंदा महाग
गेल्या काही वर्षात मोठया प्रमाणात वाढलेल्या महागाईचा फटका सुक्या मासळीलाही (मावरा) बसला आहे़ बोंबील शेकडयामागे शंभर ते दिडशे रुपये वाढलेले आहेत.
तर बांगडा, आंबडकाड, मांदेली, लोलीम, बगी, सुकट यांचेही भाव दुपटीने वाढलेले आहेत़ सुक्या मासळीचे (मावºयाचे) भाव गतवर्षीपेक्षा यावर्षी वाढलेले असले तरी पावसाळयात सुकी मासळीही ग्रामीण भागातील शेतक-यांची मुखत्वे येथील खेडया-पाडयातील आदिवासींची गरज असते.