विक्रमगडच्या मोगऱ्याला मुंबईत चांगला भाव

By admin | Published: September 2, 2016 03:33 AM2016-09-02T03:33:13+5:302016-09-02T03:33:13+5:30

यंदा बहर कमी असल्याने येथील सर्व मोगरा मुंबईच्या बाजारात जात असून त्याचा भाव ४०० ते ५०० रुपये किलो आहे. रविवार पासून तो उत्पादन कमी व मागणी जास्त यामुळे

Good mum in Vikramgad for Mumbai | विक्रमगडच्या मोगऱ्याला मुंबईत चांगला भाव

विक्रमगडच्या मोगऱ्याला मुंबईत चांगला भाव

Next

- राहुल वाडेकर,  विक्रमगड
यंदा बहर कमी असल्याने येथील सर्व मोगरा मुंबईच्या बाजारात जात असून त्याचा भाव ४०० ते ५०० रुपये किलो आहे. रविवार पासून तो उत्पादन कमी व मागणी जास्त यामुळे ८०० ते १००० किलो पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथे या तालुक्यातील मोगरा सध्या मोठ्या प्रमाणावर जात आहे.
खांडव अंतर्गत गावपाडयातील १०० ते १५० शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये मोगरा लागवड मोठया प्रमाणावर केली असून हंगाम जरी कमी असला तरी रोज एका एकरमध्ये अर्धा ते एक किलो मोगरा कळी काढली जाते आहे़ मात्र येथे स्थानिक बाजरपेठ नसल्याने व योग्य भावमिळत नसल्याने हा माल सध्या मुंबईच्या बाजारात जातो आहे. बहर कमी असल्याने तसेच भाद्रपद असल्याने या फुलांची मागणी वाढली आहे़ त्यामुळे उन्हाळयांत ८० ते ९० रुपये किलो विकला जाणारा मोगरा ४०० ते ५०० रुपये किलोने विकला जातो आहे. गौरीगणपतीच्या काळात हाच मोगरा ७००, ८०० व १००० किलो रुपये पर्यत जाण्याची शक्यता असल्याचे येथील शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलतांना सांगीतले़
येथील शेतकरी प्रामुख्याने पावसाळ्यात भातलागवड तर उन्हाळी कलिंगड, काकडी, भेंडी, चवळी, मिरची अशा प्रकारची पिके घेतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून विक्रमगड तालुक्यात फुलशेती मोठया प्रमाणात करू लागले आहेत. यावर्षी तालुक्यात हंगामा नुसार नविन लागवडीत ३६० हून अधिक हेक्टर वर भाजीपाला लागवड करण्यांत आलेली आहे. त्याच बरोबर फुलांची ही लागवड शेतकऱ्यांनी केली आहे़ गेल्यावर्षीही अंदाजीत ३० हेक्टरवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी फुलशेती केली होती व यंदा हा लागवडीचा आकडा वाढता आहे़.

तालुक्यातील विविध भागातील मोगरा बहर कमी जास्त होत असतो़ थंडी व पावसाळी हंगामामध्ये उत्पादनात घट होते तेच उन्हाळी हंगामामध्ये बहरत असते़ त्यामुळे उत्पादनानुसार उन्हाळयात कवडीमोल भावाने विकावी लागते तर पावसाळी व हिवाळी हंगामध्ये मोगरा कळीला चांगला भाव मिळत असतो़

साधारण सिझनमध्ये एक एकर जमीनीमध्ये लागवड केलेली मोगराकळी तोडण्याकरीता पाच ते सहा लोक पहाटे ५ वाजल्यापासून ते दुपारी ११ वाजेपर्यत खपतात. ते जवळजवळ ८ ते १० किलो मोगरा कळीची तोड करतात़ सर्व गावातील शेतकरी मिळून दलालाला मोगरा विक्री करतात़

Web Title: Good mum in Vikramgad for Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.