बोकडचोरांची टोळी गजाआड

By admin | Published: January 26, 2017 02:50 AM2017-01-26T02:50:53+5:302017-01-26T02:50:53+5:30

राजस्थान येथून खरेदी केलेले ८ लाख १६ हजार रूपये किमतीच्या बोकडांसह ट्रकमधील ६ लोकांचे अपहरण करणाऱ्या ७ कुख्यात आरोपीना

The gooseberries gang | बोकडचोरांची टोळी गजाआड

बोकडचोरांची टोळी गजाआड

Next

हितेन नाईक / पालघर
राजस्थान येथून खरेदी केलेले ८ लाख १६ हजार रूपये किमतीच्या बोकडांसह ट्रकमधील ६ लोकांचे अपहरण करणाऱ्या ७ कुख्यात आरोपीना अवघ्या ४८ तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्यावर अपहरण, दरोडासह मोक्का कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ही माहिती पोलीस अधिक्षिका शारदा राऊत यांनी दिली.
राज्यस्थान येथील ओमप्रकाश खाटीक हे शेतकऱ्यांकडून बोकड खरेदी करून ते मुंबईच्या देवनार भागात विक्र ी करण्याचा व्यवसाय करीत होते. ते आपल्या सहकाऱ्यांसह ८ लाख १६ हजार रुपये किंमतीचे २७२ बोकड एका ट्रकमध्ये भरून विक्री करण्यासाठी मुंबईकडे निघाले असतांना मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांच्या ट्रकला रस्त्यावर उभ्या असणाऱ्या तरु णांनी हात दाखवून थांबण्यास भाग पाडले. तुमच्या ट्रकमध्ये गायी असल्याचे सांगून पोलीस स्टेशन मध्ये चला असे फर्मावून त्यांचे मोबाईल हिसकावून घेतले. ट्रक मधील ६ लोकांना आपल्या जवळील दोन गाड्यात कोंबून ते सर्व पालघरच्या दिशेने निघाले त्या ६ लोकांना पालघर मधील सेंट जॉन कॉलेज जवळ त्यांनी उतरविले आणि ते चोर पसार झाले. तत्पूर्वी त्या गाडी मागचा ट्रकही गायब झाला होता.
आपल्याला लुटण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला. राऊत यांनी तात्काळ ८ पथकांसह स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला असता पहाटे तो विक्र मगडमार्गे मनोरकडे येत असतांना पोलीसांचा चुकवून चोरटे जंगलात पसार झाले. त्यांनी कुठलाही पुरावा मागे सोडला नसतांना पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, सहा.निरी.जितेंद्र ठाकूर, निवास कणसे, सचिन चव्हाण, हवालदार मंगेश चव्हाण, सचिन मर्दे, संदीप सूर्यवंशी, नरेश जनाठे, शंकर वळवी, जनार्दन मते, मनोज मोरे, प्रवीण पाटील यांनी १) रिजवान खान, महापोली, भिवंडी, २)अब्दुल शेख, ३)शेहवाज बागवान, ४) करीम शेख सर्व कल्याण. ५)शफीउल्ला खान, ६)समीर खान, ७)अय्याज सय्यद , वापी (गुजरात) या सात आरोपीना भिवंडी येथून ताब्यात घेतले. आरोपीनी चोरून नेलेल्या २७२ बकऱ्या पैकी १६८ बकऱ्या गणेशपुरी हद्दीतील दळेकर पाडा येथील रांनमाळात लपवून ठेवल्या होत्या. त्या ताब्यात घेऊन पोलिसांनी ह्या सात आरोपी विरोधात अपहरण, दरोडा, हल्ला करणे ई आरोपाखाली गुन्हा दाखल केला. अन्य तीन आरोपी फरार असून त्यांच्या विरोधात मोक्का लावण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.

Web Title: The gooseberries gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.