विक्रमगडमधील गावपाडे दोन महिन्यांपासून अंधारात
By admin | Published: August 16, 2016 04:40 AM2016-08-16T04:40:11+5:302016-08-16T04:40:11+5:30
तालुक्यात धामणी ग्रामपंचायतअंतर्गत पाटीलपाडा व खोरीपाडा हे पाडे येथे असून त्यांना वीज पुरवणारी महावितरण कासा येथे आहे. या पाटीलपाडा व खोरीपाडा दोन महिन्यांपासून
विक्रमगड : तालुक्यात धामणी ग्रामपंचायतअंतर्गत पाटीलपाडा व खोरीपाडा हे पाडे येथे असून त्यांना वीज पुरवणारी महावितरण कासा येथे आहे. या पाटीलपाडा व खोरीपाडा दोन महिन्यांपासून अंधारात आहे. जवळजवळ २०० ते २१५ घरे असून त्यांना आजही अंधारात दिवस काढावे लागत आहे. वीज असून फक्त ट्रान्सफॉर्मर जळाल्याने हे दोन पाडे अंधारात आहेत. एकीकडे स्वातंत्र्याच्या ६९ वर्धापन दिन साजरा करत असताना मात्र या प्रशासकीय यंत्रणा किती बेजबाबदारपणे वागत आहे, याची कल्पनाही करू शकत नाही.
मुख्य रस्त्यापासून जवळजवळ ९० ते ९२ किलोमीटर अंतर, चारही बाजूंनी शेती व प्राणी, जनावरांची भिती या संघर्षात असे दिवस काढले जात असल्याचे स्थानिक रहिवासी एस.डी. जाधव यांनी सांगितले. या महावितरण कंपनीचे कार्यालय कासा येथे असून गावकऱ्यांनी ट्रान्सफॉर्मर बसविण्यासंदर्भात अर्ज केला. परंतु ट्रान्सफॉर्मर उपलब्ध नसल्याचे कर्यालयाने सांगितले. केव्हा उपलब्ध होईल व ट्रान्सफॉर्मर कधी बसेल, कोणास ठाऊक याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर मिळवून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.