शासकीय परिपत्रकाची होळी, कला, क्रीडा शिक्षक संतप्त : तासिकांमध्ये ५० टक्के, मोबदल्यातही कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 02:58 AM2017-09-09T02:58:24+5:302017-09-09T02:58:30+5:30
राज्यातील शाळांमध्ये कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिकवणा-या शिक्षकांना सरकारने कायमस्वरूपी सेवेत सामावून न घेता उलट या विषयांच्या तासिका
पालघर : राज्यातील शाळांमध्ये कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिकवणा-या शिक्षकांना सरकारने कायमस्वरूपी सेवेत सामावून न घेता उलट या विषयांच्या तासिका व त्याचे मिळणारे मानधन यात घट करणा-या शासन निर्णयाची शुक्रवारी महाराष्ट्र राज्य कला, क्रीडा व कार्यानुभव शिक्षक संघाच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून होळी करण्यात आली.
आरटीआयनुसार कला, क्र ीडा व कार्यानुभव या तीन विषयासाठी सन २०१२-१३ ला इयत्ता ५ वी ते ७ वीच्या जिल्हापरिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत ७५ रुपये तासिकेप्रमाणे आठवड्याला १२ तासिका व महिन्याला जास्तीतजास्त ५० तासिकेसाठी नियुक्ती करण्यात आली होती. सन २०१५ मध्ये अंशकालीन निर्देशकाचे अतिथी निर्देशक करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. तर पुन्हा १०० पेक्षा जास्त पट असणाºया शाळांमध्ये ५० रुपये तासिका तत्वावर काम करण्यास भाग पाडून प्रति तासिका २५ रु पये मानधन कमी केले. तरीही हे निर्देशक या तुटपुंज्या मानधनावर अध्यापनाचे काम अनेक वर्षा पासून करीत असताना शासनाने १ सप्टेंबरच्या एक परिपत्रकाद्वारे त्यांच्या तासिकांमध्ये ५० टक्के कपात केली आहे. संबंधित निर्देशकांसाठी वयाची अट ही ठेवण्यात आली असून परीक्षा पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे.