सरकारी रुग्णालयात डॉक्टर नाहीत
By Admin | Published: November 16, 2015 11:37 PM2015-11-16T23:37:19+5:302015-11-16T23:37:19+5:30
वसई पूर्व भागातील पारोळ, मांडवी या ग्रामीण रुग्णालयात सणासुदीच्या दिवसांत डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे गरीब रुग्णांचे हाल होत असून पुढे उपचारासाठी त्यांना शहरातील
पारोळ : वसई पूर्व भागातील पारोळ, मांडवी या ग्रामीण रुग्णालयात सणासुदीच्या दिवसांत डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे गरीब रुग्णांचे हाल होत असून पुढे उपचारासाठी त्यांना शहरातील खाजगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो. परिणामी, उपचारासाठी त्यांना मोठा खर्च करावा लागतो.
मेढे गावातील अंकिता पाटील यांना प्रसूतिवेदना होत असताना शुक्रवारी रात्री ८ वा. पारोळ येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. पण, तेथे डॉक्टर नसल्यामुळे त्यांना मांडवी येथील दवाखान्यात नेण्यात आले. तेथेही तीच परिस्थिती समोर आल्याने तत्काळ त्यांना नालासोपाऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
वसई पूर्व भागात गरीब जनता राहते. त्यांच्यासाठी मेढे, भिनार येथे आरोग्य केंद्र व पारोळ, मांडवी, भाताणे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. पण, मेढे व भिनार हा भाग जंगलाने व्यापलेला असल्यामुळे सर्पदंशाचे रुग्ण नेहमी असतात. अशा वेळी जर वेळेवर उपचार झाले नाही तर रुग्ण दगावण्याचाही धोका आहे. (वार्ताहर)