सरकार मुर्दाड, अखेर ‘तिची’ झुंज संपली; अब्रू तर गेलीच, तिचा जीवही वाचवू शकले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:37 PM2017-09-24T23:37:14+5:302017-09-24T23:38:19+5:30
बोईसर (यादव नगर) येथे राहणा-या एक २२ वर्षीय विवाहितेवर झालेल्या बलात्कारा नंतर च्या धमक्याना कंटाळून अॅसिड प्यायल्या नंतर ९ महिन्यापासून तिची जगण्यासाठी सुरू असलेली झुंज
हितेन नाईक
पालघर: बोईसर (यादव नगर) येथे राहणा-या एक २२ वर्षीय विवाहितेवर झालेल्या बलात्कारा नंतर च्या धमक्याना कंटाळून अॅसिड प्यायल्या नंतर ९ महिन्यापासून तिची जगण्यासाठी सुरू असलेली झुंज आज पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात संपली. सरकार आणि पोलीस यंत्रणा व कायदे किती मुर्दाड झाले आहेत, याचाच हा प्रत्यय असल्याची प्रतिक्रिया जनतेत उमटत आहे.
बोईसरच्या यादव नगरमध्ये राहणारे एक दाम्पत्य कॅटरिंग चा व्यवसाय करीत होते.जानेवारी महिन्यात ही महिला बाजारासाठी बाहेर पडली असताना जवळच राहणाºया दोन आरोपीनी तिला आपल्या टेम्पोत घालून एका निर्जन स्थळी नेऊन सामूहिक बलात्कार केला. त्याचे मोबाईलमध्ये शुटींग केले. कुणाला याबाबत काही सांगितल्यास तुझे हे शुटिंग सर्वाना दाखवू असे सांगून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार करण्यात आला होता. शेवटी ही सर्व हकीकत आपल्या पतीला सांगितल्या नंतर आलेल्या मानसिक असंतुलनातून तिने आपल्या घरी अॅसीड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला उपचारासाठी तात्काळ बोईसर खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ती अत्यवस्थ झाल्याने तिला वलसाड च्या कस्तुरबा , कांदिवली, नायर रुग्णालय इ.अनेक रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची तब्येत दिवसेंदिवस ढासळू लागल्याने तिला पालघरच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती मागील नऊ महिन्यापासून मृत्यूशी झुंज देत होती. तिच्या उपचारावर होणारा मोठा खर्च पाहता सामाजिक कार्यकर्त्या संगीता पाटील व त्यांच्या सहकाºयांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी ह्यांची भेट घेऊन मनोधैर्य योजनेतून दोन लाख रु पयांची मदत मिळवून दिली होती. त्यामुळे तिच्यावर आता पर्यंत या रुग्णालयात उपचार सुरू होते.